‘सीसीए’विरोधामुळे फाये डिसोझा यांना डिच्चू

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

पणजी:हा तर पत्रकार फाये डिसोझांवर अन्याय   

पणजी:हा तर पत्रकार फाये डिसोझांवर अन्याय   

डी. डी. कोसंबी विचारांचा सरकारकडून अपमान:काँग्रेसची टीका
गोव्यातील डी. डी. कोसंबी विचार महोत्सवासाठी मंगलोरच्या पत्रकार फाये डिसोझा यांना निमंत्रण देऊन त्यानंतर ते मागे घेऊन गोवा सरकारने त्यांच्या विचारांचा अपमान व त्यांच्यावर अन्याय केला आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मतप्रदर्शन मांडण्याचा हक्क आहे.मात्र, त्यांनी ‘सीएए’विरोधात मत मांडल्याने भाजप सरकारने त्यांना या महोत्सवातून डिच्चू देण्याचा प्रकार केल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. रोहित ब्रास डिसा यांनी केली.
कोसंबी विचार महोत्सव हा विचार प्रकट करण्याचा हा कार्यक्रम त्यामुळे पत्रकार डिसोझा यांच्या विचारांवरच भाजप सरकारने घाला घातला व त्यांचे या महोत्सवातूनच नाव गाळण्यात आले.त्यांनी देशात सध्या जोरदार विरोध होणाऱ्या नागरिक दुरुस्ती कायद्याविरोधात मतप्रदर्शन केले होते.त्यामुळे या महोत्सवात त्या या सीएएसंदर्भात मतप्रदर्शन मांडतील व ते सरकारला भारी पडण्याची भीती वाटल्याने त्यांना दिलेले निमंत्रण मागे घेण्यात आले.जनतेसमोर सत्य परिस्थिती मांडणाऱ्यांनी सरकारविरोधात आवाज उठविल्यास त्यांचा तो दाबवण्याचा या भाजप सरकारचा प्रयत्न आहे.या सरकारला फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार हवे आहेत.महोत्सवास करण्यात येणारा खर्च हा करदात्यांच्या रक्कमेतून केला जातो त्यामुळे सरकारचे गुनगान गाण्याची सक्ती नाही, असेही ॲड. ब्रास डिसा यांनी सांगितले.
म्हापसा येथे ‘सीएए’विरोधात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी आवश्‍यक ते परवाने घेण्यात आलेले होते तरीसुद्धा ऐनवेळी या कार्यक्रमासाठी दिलेले परवाने सरकारने मागे घेतले होते. ‘सीएए’ला विरोध करणाऱ्यांना भाजप नेत्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत.सीएए बेकायदेशीर असल्याचे म्हणणाऱ्यांविरुद्ध गंभीरतेने पावले उचलली जातील असा इशाराही दिला जात आहे. प्रत्येक
नागरिकाला शांततेच्या मार्गाने मतप्रदर्शन मांडण्याचा व विरोध करण्याचा अधिकार आहे.सार्वजनिक विरोध कोणीही बंद करू शकत नाही.सरकार आपल्या सोयीनुसार फौजदारी दंड संहिता १४४ चा वापर करते. इफ्फीच्या काळात काँग्रेसने निदर्शने केली तेव्हा त्यांना या संहितेनुसार गुन्हा दाखल केला, तर इफ्फीच्या काळात ठिकठिकाणी लोकांचा जमाव झाला तरी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.भाजप किंवा पंतप्रधानांची प्रशंसा न केल्यास विरोधकांना कार्यक्रमाला बोलवण्यात येत नसल्याचे डिसा म्हणाले.

 

संबंधित बातम्या