दिव्यांगजनांसाठी कोविड -19 संदर्भातील सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याबाबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना

dainik gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

सध्याचे संकट हे दिव्यांगजनांसाठी अधिक धोकादायक ठरू शकते ते केवळ त्यांची प्रतिकारशक्ती किंवा माहिती समजून घेण्याची किंवा समजण्याची क्षमता कमी असल्यामुळे नव्हे तर अशा कोविड संबंधित सुविधा पुरविल्या जाणार्‍या केंद्रात त्यांच्या शारीरिक गरजेनुसार आवश्यक ते पर्यावरण पूरक वातावरण नसल्यामुळे देखील आहे.

नवी दिल्ली, 

आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये दिव्यांगजनांसाठी कोविड -19 ची चाचणी, विलगीकरण सुविधा आणि उपचारांसाठी मूलभूत शारीरिक सुलभता वैशिष्ट्ये सुनिश्चित करण्याच्या सूचना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. साथीच्या रोगाचा परिणाम कमी करण्यासाठी अनेक कोविड-19 केंद्रे ही गरजेनुसार वैद्यकीय कारणासाठी क्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक विभाग, विलगीकरण उपचार केंद्रे आणि चाचणी प्रयोगशाळा म्हणून ओळखली जात आहेत असे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरण विभागाच्या (डीईपीडब्ल्यूडी) सचिव शकुंतला डी. गॅमलिन यांनी लिहिले आहे.

सध्याचे संकट हे दिव्यांगजनांसाठी अधिक धोकादायक ठरू शकते ते केवळ त्यांची प्रतिकारशक्ती किंवा माहिती समजून घेण्याची किंवा समजण्याची क्षमता कमी असल्यामुळे नव्हे तर अशा कोविड संबंधित सुविधा पुरविल्या जाणार्‍या केंद्रात त्यांच्या शारीरिक गरजेनुसार आवश्यक ते पर्यावरण पूरक वातावरण नसल्यामुळे देखील आहे.

दिव्यांग व्यक्तींचा सक्षमीकरण विभाग डीईपीडब्ल्यूडीने यापूर्वीच वैकल्पिक सुलभ स्वरूपात माहिती प्रसार, दिव्यांग व्यक्तींसाठी प्राधान्य उपचार (पीडब्ल्यूडी) आणि दिव्यांग व्यक्ती, त्यांची देखभाल करणारे, सेवा करणारे तसेच दुभाषासारखी सेवा देणारे यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच निरोगी आयुष्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित केली आहेत. याव्यतिरिक्त, रूग्णालय व आरोग्य केंद्रांवर कोविड-19 चाचणीसाठी, विलगीकरण सुविधेसाठी तसेच उपचारांसाठी वाजवी निवासस्थानानुसार मूलभूत शारीरिक सुलभता वैशिष्ट्ये सुनिश्चित करणे देखील आवश्यक आहे.

दिव्यांगजन, हालचालींवर मर्यादा असलेल्या व्यक्ती आणि जे मदतनीसांवर अवलंबून आहेत अशा व्यक्तींना यापुढे या महामारीच्या काळात कोणताही त्रास होऊ नये म्हणून राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना विनंती करण्यात आली आहे की प्रवेशयोग्यतेची ही मूलभूत वैशिष्ट्ये तातडीने पुरविली गेली पाहिजेत. प्रवेशयोग्यतेची मूलभूत वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेतः

1. दिव्यांगजनांसाठी विशेषतः व्हीलचेयर वापरकर्त्यांसाठी सर्व कार्वान्वयन आणि नियंत्रण यंत्रणा आणि स्वयंचलित साधने (सॅनिटायझर डिस्पेंसर, ग्लोव्ह केसेस, साबण, वॉश बेसिन) दिव्यांगजनांना सहज उपलब्ध होतील अशा पद्धतीने असावीत.

2. सर्व प्रमुख माहिती फलक प्रमाणित आवश्यकतेनुसार रंगसंगती असलेले साधे नकाशा स्वरूपात असावेत.

3.रेलिंगसह एम्प्स (ग्रेडियंट 1:12) प्रदान केले आहेत.

4.  स्वागत कक्षात, चाचणीच्या ठिकाणी आणि औषधांच्या दुकानात एक तरी कमी उंचीचा काउंटर असावा.

5. महत्त्वाच्या बातम्यांच्या सार्वजनिक घोषणेसाठी श्राव्य घोषणा आणि मथळे असलेले व्हिडिओ असावेत.

6. दिव्यांगजनांच्या मदतीसाठी लिफ्टमध्ये प्रवेशाची सुविधा किंवा कमीतकमी एका लिफ्टमध्ये लिफ्टमॅन नियुक्त असल्याची खातरजमा करणे.

7. दिव्यांगजनांसाठी प्रवेश करण्यायोग्य शौचालय असलेल्या राखीव जागा / खोल्या / कक्ष असावेत.

8. कोविड-19 रुग्ण विशेषतः बौद्धिक विकलांग किंवा मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तींच्या बरोबर असणाऱ्या मदतनीसांसाठी व्हेस्टिब्युलर केबिनची तरतूद असावी.

संबंधित बातम्या