अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना इंटरनेटचा अडसर

Dainik Gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नेटवर्क कनेक्टीव्हीच्या विसंगतीची समस्या आढळते. काही विद्यार्थ्यांना नेटवर्क मिळवण्यासाठी घराबाहेर येऊन एक विशिष्ट जागी उभे रहावे लागते. अगदी कमी विद्यार्थ्यांकडे ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा उपलब्ध आहे. ब्रॉडबॅण्ड कनेक्टीव्हिटीची गती - वेग कमी असल्याने ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांसाठी हा एक मोठा अडसर ठरत आहे.

अवित बगळे

पणजी

सरकारने गावागावात इंटरनेटची सुविधा व्यवस्थित आहे याचा डांगोरा कितीतरी वर्षेआधीपासून पिटणे सुरु केले असले तरी या इंटरनेटच्या चांगल्या सुविधेअभावी सध्या अभयांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. उत्तर गोव्यातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय असलेल्या आसगाव येथील आसगाव येथील आग्नेल इन्सिस्ट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड डिझाईनच्या विद्यार्थ्यांना सध्या इंटरनेट कनेक्टिव्हीटीची समस्या जाणवत असल्याची माहिती त्या महाविद्यालयातून मिळाली आहे.
सर्वत्र पसरलेल्या कोविड १९ च्या प्रसारामुळे देशभरात सद्यस्थितीत चालू असलेल्या टाळेबंदीमुळे पूर्ण देशातील शैक्षणिक संस्था तसेच विद्यापीठांना आपले सर्व वार्षिक उपक्रम रद्द करावे लागले आहेत. गोवा विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकानुसार कोविड १९ च्या प्रसारामुळे १६ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२० पर्यंत सर्व वर्ग रद्द करण्याची सुचना होती. गोवा विद्यापीठच्या परिपत्रकाला अनुसरून आसगाव येथील आग्नेल इन्सिस्ट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड डिझाईन या महाविद्यालयाने टाळेबंदीचा समस्या लक्षात घेता ऑनलाईन अध्यायन, अध्यापन पद्धत निवडली.
महाविद्यालयाने ज्या ऑनलाईन पद्धतीची निवड केली आहे,त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे. १) पी.पी.टी. आणि पी.डी.एफ. द्वारे तयार केलेल्या साधानांना गुगल वर्गाद्वारे व्यासपीठ देणे २) गुगल वर्ग व इमेलच्या व्यासपीठाद्वारे घरबसल्या विकसित केलेल्या चलचित्र व्याख्याने, स्वाध्याय आणि प्रश्नमंजुषा यांचे श्रेणीकरण करणे ३) संपूर्ण अभ्यासक्रमाला अनुसरून तयार हिशेब प्रश्नावली व संपूर्ण अंकाविषयीची निरसनप प्रक्रीया ४) एन्.पी.टी.एल्. (आय.आय.टी.) च्या साहित्याची पी.डी.एफ. द्वारे चलचित्रे-कोर्स ५) विद्याबुकच्या व्यासपीठांद्वारे ई पुस्तके ६)विद्यापिठातील वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने ऑनलाईन जर्नल वापरण्याची संधी ७) मागणीनुसार स्कॅन केलेल्या पाठ्यपुस्तकांच्या प्रती उपलब्ध ८) महाविद्यालयातील संबंधित प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या समस्या ईमेल, व्हॉटस्ॲप आणि व्हिडिओद्वारे सोडवून मदत पुरविली.
आग्नेल इन्सिस्ट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड डिझाईन हे उत्तर गोव्यातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय असल्यामुळे येथे येणारे बरेचसे विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येतात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नेटवर्क कनेक्टीव्हीच्या विसंगतीची समस्या आढळते. काही विद्यार्थ्यांना नेटवर्क मिळवण्यासाठी घराबाहेर येऊन एक विशिष्ट जागी उभे रहावे लागते. अगदी कमी विद्यार्थ्यांकडे ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा उपलब्ध आहे. ब्रॉडबॅण्ड कनेक्टीव्हिटीची गती - वेग कमी असल्याने ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांसाठी हा एक मोठा अडसर ठरत आहे. त्यामुळे त्यांना भ्रमणध्वनीवरून उपलब्ध असलेल्‍या डेटा योजनेवर अवलंबून रहावे लागते. याची तुलना ब्रॉडबॅण्ड कनेक्शनाकडे होऊ शकत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अशी प्रतिक्रीया दिली आहे की ऑनलाईन वर्गाचे बरेच फायदे आहेत पण ते विद्यार्थी वापरत असलेला डेटा पॅक - योजना ही त्यांच्याशी अपुरी आहे. बरेचसे विद्यार्थी ब्रॉडबॅण्ड वापरत नसल्यामुळे त्यांना या समस्येला सामोरे जावे लागते. देशातील टाळेबंदी ३ मे पर्यंत विस्तारीत केलेली असल्यामुळे वर्गामध्ये घेतल्या न जाणाऱ्या व्याख्यानांच्या नुकसान भरपाईसाठी महाविद्यालये व विद्यापीठ ही तंत्रज्ञानावर अवलंबून राहतील. विद्यार्थ्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने ध्येयाने या महाविद्यालाने ऑनलाईन वर्ग सुरु ठेवले असले तरी अनेक विद्यार्थ्यांना उत्तम इंटरनेटअभावी त्याचा लाभ घेणे दुरापास्त होत असल्याची माहिती मिळाली आहे.

संबंधित बातम्या