‘खाजनगुंडो’चे काम होवूनही शेतीकडे दुर्लक्ष

Irrigation department needs attention
Irrigation department needs attention

मोरजी : भारत कृषीप्रधान देश म्हणून गणला जातो. गावागावातील शेतीला प्राधान्य देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवित असतात. त्या योजनांचा अनेक शेतकरी लाभ घेत आहेत.
पर्यटन स्थळाबरोबरच परिसरातील शेकडो हेक्टर वायंगण शेती, जी दरवर्षी पाण्याखाली जात होती, शापोरा नदीचे खारे पाणी बांध फुटून शेतात गेल्‍याने नुकसानी होत होती.

त्याला आळा बसवण्यासाठी बांधाला सुरक्षा देण्यात आली आहे. या बांधाच्या बांधकामामुळे उर्वरित शेतीचे मळे फुलतील अशी अपेक्षा होती. मात्र, अधिक शेती पडिक असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या बांधाचा लाभ शेतकऱ्यांना अजिबात झाला नाही. मात्र, पर्यटन स्थळ म्हणून अल्पकाळात नावारूपास आले आहे. या ठिकाणी रात्री अपरात्री अनेक प्रेमीयुगले या पर्यटनस्थळी बसलेली दिसून येतात. तर काही जण दारुच्‍या बाटल्या टाकून हा परिसर विद्रूप करत असतात. चित्रपट मालिका निर्माते या ठिकाणी चित्रीकरण करत असतात. या परिसरातील शेतीचे मळे फुलले असते तर परिसर आणखी खुलून दिसला असता. पार्से पंचायत क्षेत्रातील वायडोंगर परिसरातील खाजनगुंडो हे एक पर्यटन स्थान बनले आहे. एका बाजूने समाधान तर दुसऱ्या बाजूने चिंता व्यक्त करणारे हे स्थळ हळूहळू बदनाम होत असताना दिसत आहे. ठिकठिकाणी खचलेल्या कामाकडे जलसिंचन खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे विद्रुपीकरणात वाढ होताना दिसत आहे.

हे पर्यटकांसाठी एक चांगले स्थळ आहे. मात्र, रात्री अपरात्री या ठिकाणी काही युवक वाहने पार्क करून मोठ्या आवाजात संगीत लावून स्थानिकांना त्रास देण्‍याचा प्रयत्‍न करतात. खाजनगुंडो मानस आणि शेतीचा परिसर पूर्वी हिरवागार वाटायचा. जुना बांध असताना ठिकठिकाणी भगदाडे पडून शापोरा नदीचे खारे पाणी शेतात घुसून १०० एकरपेक्षा जास्त वायंगण शेती नुकसानीत जात होती. वारंवार पाणी घुसत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपली शेती पडिक ठेवली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दुहेरी लाभ व्हावा या हेतूने या परिसराचे पावणे पाच कोटी खर्च करून सुशोभीकरण केले. पक्का बांध बांधल्यानंतर शेतीला चालना मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पर्यटन स्थळ झाले आणि शेती अधिकाधिक पडिक राहिल्याचे चित्र दिसत आहे .
या बांधाचा शेतीला अजिबात फायदा झाला नाही. या परिसराचा पर्यटनदृष्‍ट्या विकास केला खरा मात्र शेतकऱ्यांना शेती उत्‍पादनासाठी कोणत्याच योजना आखलेल्या नाहीत. शेती मळे फुलले असते तर आणखी पर्यटक आकर्षित झाले असते. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्‍‍न आजपर्यंत कुणीही सोडवण्याचा प्रयत्‍न केला नाही.

कामाचा दर्जा राखला नाही
बांधाचे काम करण्यासाठी दोन वेळा एका ठेकेदाराला ठेका मिळाला. जलसिंचन खात्याअंतर्गत पावणे पाच कोटी रुपये खर्च करून या स्थळाचे सुशोभीकरण केले. काम करताना अधिकाऱ्यांचे लक्ष नव्हते, त्‍यामुळे या परिसराचे अनेक ठिकाणी काम निकृष्‍ट दर्जाचे झाले. अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला भेट दिल्‍यास ठेकेदाराने कशा पद्धतीने काम केले हे दिसून येईल.

चित्रपट उद्योगासाठी ‘ईएसजी’ची एक खिडकी सेवा

आमदार सोपटे यांनी लक्ष द्यावा
आमदार दयानंद सोपटे यांनी अधिकाऱ्यांसोबत या बांधाच्या दुर्दशेची पाहणी केली होती. त्यावेळी आमदार सोपटे यांनी अधिकारी व ठेकेदार भोमकर यांना धारेवर धरले होते. ठेकेदार भोमकर यांनी लगेच बांधाची दुरुस्ती करून देणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजपर्यंत याची दुरुस्ती केली नाही. आता आमदार सोपटे सरकारात असल्याने त्यांनी प्रयत्‍न केल्‍यास त्याची दुरुस्ती करून घेवू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com