कुडचडे ‘युवा स्वराज’ला आयएसओ प्रमाणपत्र

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

कुडचडे:कुडचडे येथील युवा स्वराज स्पोर्ट्स अँड कल्चरल
कुडचडे येथील युवा स्वराज स्पोर्ट्स ॲण्ड कल्चरल क्लबाला उत्कृष्ट कार्याबद्दल प्रतिष्ठेचे आय. एस. ओ. प्रमाणपत्र प्राप्त झाले असून कुडचडे भागातून या क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
सदर क्लब समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक कला व संस्कृती संवर्धन व आरोग्य संदर्भात उपक्रम राबवीताना युवा वर्गासाठी क्रीडा, कला कार्यक्रम आयोजित करून युवा पिढीला सतत प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहे.

युवा स्वराजच्या यशात प्रतीक वस्त, रवीत नाईक, अनिकेत नाईक व इतर सर्व पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग असतो. आय. एस. ओ. प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे, त्याचा कालावधी २६ डिसेंबर २०२२ पर्यंत म्हणजे तीन वर्षांचा आहे. प्रतिष्ठेचे प्रमाणपत्र मिळाल्याचा आनंद होत असून क्लबच्या यशासाठी सतत प्रयत्नरत राहिलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या यशाला मिळालेले गोडफळ आहे.लोककला आणि संस्कृती टिकवून ठेवताना युवा पिढीला आदर्श ठरणारे कार्य करताना समाजाला जे हवे ते कायम कार्य करण्यासाठी आम्ही सर्वजण एकसंघ राहून या पेक्षा अधिक जोराने कार्य करत राहणार असल्याचे अध्यक्ष प्रतीक वस्त यांनी यावेळी सांगितले.

सायक्लोथॉन मोहिमेला मडगावात उत्तम प्रतिसाद

संबंधित बातम्या