गोवा विद्यापिठात आता जपानी भाषा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

पणजी:जपान सरकारशी सामंजस्य करार : फेब्रुवारीपासून अभ्‍यासक्रमास प्रारंभ
गोवा विद्यापीठात आता जपानी भाषा शिकता येणार आहे.विद्यापिठाने जपान सरकारशी याविषयी सामंजस्य करार केला असून, फेब्रुवारीमध्ये विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिकता येणे शक्य होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला सुरवात होणार असून, विद्यापीठाने प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे.जपान फाउंडेशनच्या सहकार्याने हा कोर्स शिकविला जाणार आहे.प्राथमिक स्तर प्रमाणपत्र कोर्स असणार आहे.विद्यापाठीतील जपान भाषा विभागात जे भविष्यात काम करू इच्छितात, त्यांच्यासाठी हा कोर्स महत्त्वाचा आहे, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.
या भाषेचा कोर्स पूर्ण करणारे विद्यार्थी जपान फाऊंडेशन, भारत आणि इतर २३ देशांमध्ये काम करू शकतात. जो विद्यार्थी बारावी उत्तीर्ण आहे, तो विद्यार्थी प्रथम स्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो.तीन महिन्यांसाठी हा अभ्यासक्रम असून, तो १५ मे पर्यंत चालणार आहे.या कोर्ससाठी ५ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
या अभ्यासक्रमाविषयी माहिती करून घ्यावयाची आहे, त्यांच्यासाठी उद्या, २४ रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात माहिती दिली जाणार आहे.गोवा विद्यापीठाच्या बाहेरील कोणीही विद्यार्थी या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकतो, असे विद्यापीठाने म्हटले आहे.ज्यांना जपानी संस्कृतीचे सखोल आकलन व्हावेसे वाटते, त्यांना हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे.उच्च शिक्षणासाठी जपानला जाण्याची योजना करणाऱ्यांसाठी ही पर्वणी असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

गोव्‍यातील नेमबाजांना भवितव्‍य

संबंधित बातम्या