वेध जिल्हा पंचायत निवडणुकीचे

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

जिल्हा पंचायतीच्या बार्से मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी बरेचजण इच्छुक असून फातर्पा येथील उद्योजक खुशाली (प्रदीप) देसाई यांनीही निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी चालवली आहे.

मडगाव: जिल्हा पंचायतीच्या बार्से मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी बरेचजण इच्छुक असून फातर्पा येथील उद्योजक खुशाली (प्रदीप) देसाई यांनीही निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी चालवली आहे.

देसाई हे शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानचे माजी अध्यक्ष व विद्यमान उपाध्यक्ष आहेत. फातर्पाचे ते माजी पंचही आहेत. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचे ते कार्यकर्ते आहेत. मागची २२ वर्षे राजकीय कार्यकर्ता म्हणून कवळेकर यांच्यासाठी ते वावरले आहेत. या खेपेस स्वतः जिल्हा पंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून निवडणुकीसंदर्भात कवळेकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली आहे.

फातर्पा, मोरपिर्ला, बार्से, मळकर्णे या पंचायतींचा बार्से मतदारसंघात समावेश होतो. देसाई गेली अनेक वर्षे सामाजिक, धार्मिक क्षेत्रात ते कार्यरत असून समाजाच्या सर्व थरात त्यांचा जनसंपर्क आहे.

कवळेकर यांनी भाजप उमेदवारीसाठी शिफारस न केल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा त्यांचा इरादा आहे.
 

संबंधित बातम्या