काणकोण कृषी भवनचा उद्या पायाभरणी सोहळा

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

काणकोणमधील कृषी भवनाची पायाभरणी शुक्रवारी (ता. ३०) सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शेळेर येथील कृषी खात्याच्या मालकीच्या जागेत हे कृषी भवन उभारण्यात येणार आहे.

काणकोण  : काणकोणमधील कृषी भवनाची पायाभरणी शुक्रवारी (ता. ३०) सकाळी ११.३० वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शेळेर येथील कृषी खात्याच्या मालकीच्या जागेत हे कृषी भवन उभारण्यात येणार आहे. यावेळी कृषी मंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, नगराध्यक्षा नितू समीर देसाई, कृषी खात्याचे संचालक नेव्हील आल्फान्सो व स्थानिक नगरसेविका छाया सोयरू कोमरपंत उपस्थित असतील. 

या भवन संकुलात कृषी कार्यालय, परिषद सभागृह, निवासी व्यवस्था व तळमजल्यावर कृषी बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी सांगितले. काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रासमोर कृषी खात्याच्या मालकीची जमीन आहे. या जमिनीवर हे संकुल उभारण्यात येणार आहे. ही विस्तृत जागा असून या ठिकाणी संकुलाबरोरच विविध कृषी उत्पादनाचा प्रात्यक्षिक प्लॉट तयार करण्याची योजना आहे. त्याचप्रमाणे रोपवाटिकाही तयार करण्याचे नियोजन आहे.

रस्त्याच्याकडेला बसून कृषी उत्पादनाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना या संकुलात जागा देण्यात येणार आहे. सध्या शेतकरी त्यांत प्रामुख्याने महिला जोखीम पत्करून आपल्या मालाची विक्री करीत आहेत. ते काही वेळा धोकादायक ठरू शकते त्यासाठी ही योजना करण्यात आली असल्याचे उपसभापती फर्नांडिस यांनी 
सांगितले.

संबंधित बातम्या