गोव्यात येणार मोठी गुंतवणूक, तीन लाख रोजगारनिर्मिती

Dainik Gomantak
मंगळवार, 2 जून 2020

राज्यात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.  सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून काही उद्योग राज्यात यावेत यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. विशेष आर्थिक क्षेत्राला दिलेली जमीन परत मिळाल्यावर उद्योगांसाठी जमिनही राज्यात उपलब्ध झाली आहे.

अवित बगळे
पणजी

कोविड टाळेबंदीच्या काळात केवळ आरोग्याच्या आघाडीवर सरकारने काम सुरु ठेवलेले नाही. सरकारने येत्या वर्षभरात किमान तीन लाख जणांना थेटपणे रोजगार देता येतील असे उद्योग राज्यात यावेत यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. ॲपल, सॅमसंग आणि वोक्सवॅगनसारख्या कंपन्यांशी सरकाराची बोलणी यशस्वी होत आली असून ती अंतिम टप्प्यात पोचली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
राज्यात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.  सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून काही उद्योग राज्यात यावेत यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. विशेष आर्थिक क्षेत्राला दिलेली जमीन परत मिळाल्यावर उद्योगांसाठी जमिनही राज्यात उपलब्ध झाली आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सध्याचे उद्योग सुरु करतानाच गोमंतकीय बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी सरकारने चीनमधून बाहेर पडणारे उद्योग गोव्यात यावेत यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. सत्ताधारी भाजपशी संबंधित काही जणांनी आपले दिल्लीतील वजन वापरून ॲपल आणि सॅमसंगशी गोवा सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. त्याशिवाय वोक्सवॅगनने गाड्यांचे उत्पादन करणारा कारखाना गोव्यात उभारावा यासाठीही सरकारचे प्रयत्न आहेत. प्राथमिक पातळीवर सुरु झालेली ही बोलणी पुढील टप्प्पात पोचली आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात यापैकी एक किंवा दोन प्रकल्पांची घोषणा भर पावसाळ्यात केली जाऊ शकते.
सरकारने केली आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांशी बोलणी करून त्यांना नेमके काय बदल हवे आहेत हे समजून घेतले जात आहेत त्यानंतर त्यांच्‍या सोयीसाठी हे बदल केले जाणार आहेत. सध्या काही अधिकाऱ्यांकडे गुंतवणुकीला पोषक असे वातावरण तयार करण्यासाठी कोणत्या प्रशसाकीय सुधारणा केल्या पाहिजेत, कोणती धोरणे दुरुस्त केली पाहिजेत किंवा बदलली पाहिजेत याचा आढावा घेण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
याशिवाय औषध निर्मिती कंपन्यांही गोव्यात याव्यात यासाठी कंपन्‍यांचे वरिष्ठ अधिकारी व सरकारचे प्रतिनिधी यांच्यात बोलणी सुरु झाली आहेत. २७ औषध निर्मिती कंपन्यांपैकी बड्या कंपन्यांवर सरकारचा डोळा आहे. दिल्लीतून यासाठी सूत्रे हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तीन लाख जणांना रोजगार मिळाला कि अन्य तीन लाख जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल असा सरकारचा अंदाज आहे. येत्या वर्षभरानंतर ही रोजगार निर्मिती होणार असली तरी सरकारने आतापासूनच त्यासाठी नेटाने प्रयत्न सुरु केले आहेत.

सरकारने राज्यात गुंतवणूक यावी यासाठी सध्याची धोरणे बदलण्याची तयारी ठेवली आहे. कोणत्या कंपन्यांशी बोलणी सुरु आहेत हे आताच जाहीर करता येणार नाहीत मात्र अनेक कंपन्यांशी बोलणी सुरु आहेत ही बाब खरी आहे. राज्यात गुंतवणूक यावी यासाठी सरकारची कवाडे खुली आहेत. गुंतवणूक आणण्यासाठी धोरणांचा आढावा घेण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

संबंधित बातम्या