पणजी स्मशानभूमीत अखेर उजेड पडला...

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

पणजी स्मशानभूमीत लाईट नसल्याने एका मृतदेहावर गाडीची लाईट लावून अंत्यसंस्कार करावे लागले होते. याबाबतचे वृत्त २१ ऑक्टोबर रोजीच्या दै. ‘गोमन्तक’मध्ये ‘पणजी स्मशानभूमीच्या यातना संपणार कधी?’ या मथळ्यासह प्रसिद्ध केल्यावर लगेच महापालिकेच्या माध्यमातून तेथे मोठा विजेचा दिवा प्रकाशासाठी लावण्यात आला. 

पणजी : पणजी स्मशानभूमीत लाईट नसल्याने एका मृतदेहावर गाडीची लाईट लावून अंत्यसंस्कार करावे लागले होते. याबाबतचे वृत्त २१ ऑक्टोबर रोजीच्या दै. ‘गोमन्तक’मध्ये ‘पणजी स्मशानभूमीच्या यातना संपणार कधी?’ या मथळ्यासह प्रसिद्ध केल्यावर लगेच महापालिकेच्या माध्यमातून तेथे मोठा विजेचा दिवा प्रकाशासाठी लावण्यात आला. 

लाईट आल्याने आता लोकांना चाचपडत मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागणार नाहीत. शिवाय येथे येणाऱ्या मद्यपींचे प्रमाणही कमी होईल, अशी अपेक्षा येथील रहिवाशांनी व्यक्त केली. येथे असणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावरही लवकरात लवकर लाईट लावण्याची विनंतीही येथील लोकांनी केली आहे. 

पणजी स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. हे काम नोव्हेंबर महिन्यात संपेल आणि लगेच तात्पुरती स्मशानभूमी बंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

 

संबंधित बातम्या