24 तासात कोविड-19 चे 4,611 रुग्ण बरे

In 24 hours, 4,611 patients of Kovid-19 were cured
In 24 hours, 4,611 patients of Kovid-19 were cured

नवी दिल्‍ली,

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 4,611 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 1,14,073 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोविड-19 रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 48.20% वर पोहोचले आहे. आजमितीस 1,15,942 रुग्ण संक्रमित असून ते सक्रिय वैद्यकीय परीक्षणाखाली आहेत.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने संक्रमित व्यक्तींमध्ये नोवेल कोरोना विषाणू शोधण्यासाठी चाचणी क्षमता वाढविली आहे. सरकारी प्रयोशाळांची संख्या 520 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 222 पर्यंत (एकूण 742) वाढविण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 1,37,938 नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 45,24,317 आहे.

कोविड-19 शी संबंधित सर्व  तांत्रिक मुद्द्यांविषयी, मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यासंबंधी अधिकृत व अद्ययावत माहितीसाठी कृपया येथे नियमितपणे भेट द्याः https://www.mohfw.gov.in/  आणि @MOHFW_INDIA.

कोविड -19 वर काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा : + 91-11-23978046 या हेल्पलाइनवर किंवा 1075 (टोल फ्री) क्रमांकावर. कोविड -19 वरील राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी देखील https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf  यावर उपलब्ध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com