गेल्या 24 तासात कोविड-19 चे 6922 रुग्ण बरे

Pib
गुरुवार, 18 जून 2020

आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 60,84,256 इतकी आहे.

मुंबई ,

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 6922 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत कोविड-19 चे एकूण 1,86,934 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 52.80% पर्यंत वाढला आहे. सध्या, 1,55,227 रुग्ण वैद्यकीय देखरेखीखाली आहेत.

सरकारी प्रयोगशाळांची संख्या 674 आणि खासगी प्रयोगशाळांची संख्या 250 (एकूण 924) पर्यंत वाढवली आहे.  विभागणी पुढे दिली आहे –

रीअल-टाइम आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा : 535 (सरकारी 347 + खाजगी 188)

ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा : 316  (सरकारी 302  + खाजगी 14)

सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा : 73 (सरकारी 25 + खाजगी 48)

गेल्या 24 तासांत 1,63,187 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत चाचणी केलेल्या नमुन्यांची एकूण संख्या 60,84,256 इतकी आहे.

संबंधित बातम्या