भारतातील ८ समुूद्र किनाऱ्यांना मिळाला मानाचा 'ब्लू फ्लॅग' दर्जा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

भारतातील द्वारका, शिवराजपूर, घोघला, कासरकोड, कप्पड, रुशिकोंडा, अंदमान आणि निकोबार या समुद्र किनाऱ्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सोबतच त्यांनी कौतूकही केले आहे.

नवी दिल्ली- पर्यावरण पूरक आत्यंतिक स्वच्छ आणि पर्यटनासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा असलेल्या समुद्र किनाऱ्यांना 'ब्लू फ्लॅग' पुरस्कार हा पुरस्कार दिला जातो. भारतातील आठ समुद्र किनाऱ्यांना प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या ‘ब्लू फ्लॅग’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कर्नाटक, केरळ, गुजरात आंध्र प्रदेश, ओडिशा, दीव, अंदमान येथील समुद्र किनाऱ्यांना हा मान मिळाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

भारतातील द्वारका, शिवराजपूर, घोघला, कासरकोड, कप्पड, रुशिकोंडा, अंदमान आणि निकोबार या समुद्र किनाऱ्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सोबतच त्यांनी कौतूकही केले आहे.

जगातल्या ५० देशांमधील समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्येच आता भारतातील समुद्र किनाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारासोबतच देशातील समुद्र किनाऱ्यावरील प्रदूषण नियंत्रणासाठी ‘आंतरराष्ट्रीय बेस्ट प्रॅक्टीस ‘पुरस्कारसाठीदेखील भारताची निवड करण्यात आली आहे.

भारत हा ब्लू फ्लॅगचा पुरस्कार मिळविणारा आशिया खंडातील चौथा देश ठरला आहे. याआधी दक्षिण कोरिया, जपान आणि संयुक्त अरब अमिराती यांना हा ब्लू फ्लॅगचा पुरस्कार मिळाला होता. या देशांना ५ ते ६ वर्षांचा कालावधी यासाठी खर्च करावा लागला होता. आता या यादीमध्ये भारताचादेखील समावेश झाल्याने सबंध भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब ठरणार आहे. 

जगातील 4664 समुद्र किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग मिळाला आहे. भारताने समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले होते.  पर्यटनासाठी त्यांचा दर्जा कसा वाढवला जाऊ शकतो यासाठीही देशातील पर्यावरण विभाग सातत्याने प्रयत्नशील होता. हा पुरस्कार प्राप्त झालेले समुद्र किनारे हे आंतरराष्ट्रीय सुविधा असलेले, प्लॅस्टिक मुक्त आणि पिण्यासाठी अत्यंत शुद्ध पाणी देणारे असतात. तसे सर्वेक्षण संबंधित संस्थेकडून केले जाते. त्यानंतरच हा फ्लॅग दिला जातो. आता भारतातील समुद्र किनाऱ्यांनाही हा फ्लॅग मिळाल्याने ही गर्वाची बाब आहे.  

 भारतातील या समुद्रकिनाऱ्यांना मिळाला ब्लू फ्लॅगचा मान- 
1) शिवराजपूर बीच ( गुजरात)
2) गोल्डन बीच( ओडिशा)
3) घोघाला बीच ( दीव)
4) पादुबिदरी बीच (कर्नाटक)
5) कासरकोड बीच (कर्नाटक)
6) कप्पड बीच( केरळ)
7) रुशिकोंडा बीच( आंध्र प्रदेश)
8) राधानगर बीच ( अंदमान आणि निकोबार)

संबंधित बातम्या