गोव्याचं एक खास वैशिष्टय 'घुमट वाद्य’
घुमटांचा लयबद्ध नादDainik Gomantak

गोव्याचं एक खास वैशिष्टय 'घुमट वाद्य’

घुमट हे वाद्यदेखील इतर वाद्यांप्रमाणेच शास्त्रशुध्द पद्धतीनं वाजवायचं असतं आणि ते तसं वाजवण्यासाठी ते शिकून घेण्याचीही गरज असते

चतुर्थीच्या दिवसात ‘घुमट (Ghumat) वादनाला(instrument)’ एक ग्लॅमर येतं. ‘‘घुमट हे वाद्य‘गोमंतकीय’ आहे आणि ‘घुमट आरती’ हे गोव्याचं (Goa) एक खास वैशिष्टय आहे’’ अशा स्वामित्व हक्काच्या जाणिवेतून घुमट आपण आपल्याला हव्या तशा ‘हातांनी’ वाजवू शकतो अशाप्रकारचा समज फैलावत चालला आहे. ‘आमच्या वाड्यावर आता घुमट आरतीच जाता’ अशा तऱ्हेची कौतुकपूर्ण वाक्यं हल्ली सर्रास ऐकू येतात.

घुमटांचा लयबद्ध नाद
बाप्पांसाठी Chocolate Modak कसे बनवायचे

मात्र घुमट हे वाद्यदेखील इतर वाद्यांप्रमाणेच शास्त्रशुध्द पद्धतीनं वाजवायचं असतं आणि ते तसं वाजवण्यासाठी ते शिकून घेण्याचीही गरज असते. ‘घुमट’ वाद्याचा अभ्यास केलेले आणि त्यावर चढवण्यात येणाऱ्या चामड्यासंबंधात नवीन तंत्र शोधून काढण्यासाठी विशेष प्रयास करणारे संगीत शिक्षक विनायक आखाडकर यांची खंत हिच आहे की, घुमटाच्या लोकप्रियतेमुळे आणि ते वाजवायच्या अनियंत्रित हव्यासामुळे घुमटवादनाची शास्त्रशुद्‌धता आजकाल हरवत चालली आहे आणि घुमट वादन आपली लयबद्‌धता हरवून कर्कश बनत चालले आहे.

‘‘घुमटाची ‘घुमी’ म्हणजे घुमटामधून निघणारा अनुनाद (रेझोनान्स) हा त्याच्यावर पडणाऱ्या थापेमुळे लपता कामा नये. त्या ‘घुमी’मध्येही स्वरांची साथ करण्याची क्षमता असायला हवी. विविध बोलांसाठी घुमटाच्या विशिष्ट भागावर विशिष्ट तऱ्हेने बोट यायला हवे आणि वाद्यांवर होणाऱ्या आघातांच्या तारतेमधूनही (वोल्युम) आरतीचे शब्द नीट ऐकू आलेच पाहिजेत. घुमट वादनात तीन वाद्ये वापरली जातात. घुमट, समेळ आणि कासाळे. या तीनही वाद्यांमधला समतोल, चालीची लयकारी सांभाळणारा असला पाहिजे. इतर कुठल्याही सांगितिक रिवाजाप्रमाणेच घुमट आरतीतही विलंबित, मध्य आणि द्रूत अशी लयगती असायलाच हवी’’. ‘घुमट आरती परिचय’ हे पुस्तक लिहिणारे विनायक आखाडकार, घुमट आरती संबंदाने आपले वरील विचार तिव्रतेने मांडत होते. हल्ली घुमट आरतीच्या नावाने ज्याप्रकारे घुमट वादन केले जाते त्यावरचा त्यांचा आक्षेप त्यांच्या तळमळीच्या शब्दांनी व्यक्त होत होता.

घुमटांचा लयबद्ध नाद
Ganesh Festival: या ठिकाणी आहे गणेशाचे एकमेव 'नरमुखी मंदिर' एकदा अवश्य भेट द्या

घुमटासाठी वापरण्यात येणाऱ्या घोरपडीच्या चामड्यावर जेव्हा बंदी आली तेव्हा आखाडकर यांनी बकरीच्या चामड्यावर प्रयोग करुन (बकरीच्या विशिष्ट भागाचे पातळ चामडे मिळवून, नंतर ते चोवीस तास भिजवून आठ दिवस सावलीत सुकवून वगैरे) घुमटाच्या मूळ नादाकडे साम्य असणारा आवाज मिळवला होता. तेव्हा त्यांचे फार कौतुकही झाले होते मात्र आजकाल बकरीचे कुठल्याही प्रकारचे चामडे वापरुन घुमट ज्यातऱ्हेने बाजारात रस्त्याच्या कडेला किंवा इतरत्र विक्रीला ठेवली जातात. त्यावर चिंता व्यक्त करुन आखाडकर म्हणतात की अशा प्रकारच्या वाद्यामुळेच जी घुमटे योग्य नाद उत्पन्न करु शकत नाहीत, त्यांच्यावर हातांची ताकद जोरकसपणे आजमावली जाते. घुमट हे ‘रणवाद्य’ नव्हे तर देवाची आराधना करण्यासाठी वापरले जाणारे वाद्य आहे हे वाजवण्यांनी लक्षात घ्यायला हवे. घुमटवादनात शक्तीची नव्हे तर युक्तीची गरज असते.

गोव्यात घुमटे बनवणाऱ्या आणि घुमट वादनाबद्दल अिधकाराने बोलणाऱ्या विनायक आखाडकर यांच्यासाठी सदैव अभिमानाची गोष्ट ही राहीली आहे की जेव्हा कला आणि संस्कृती संचलनालयाने घुमट आरती स्पर्धा आयोजित केली तेव्हा त्या स्पर्धेत बहुतेक ‘घुमटे’ आखाडकर मास्तरांचीच वाजत होती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com