
यापुर्वी आपण बऱ्याचदा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड यांच्यातील वादाचे अथवा दोघांनी एकमेकांची काळजी घेण्यासाठी काय काय केले. याबद्दल वाचले किंवा ऐकले असाल. दोघांकडून नात्याची वेल अधिक फुलवण्यासाठी ही प्रयत्न सुरु असतात. असे असले तरी ब्रेकअप होताच ते एकमेकांशी कसे वागतील याबद्दल कोण ही सांगु शकत नाही कारण असेच एक प्रकरण चांगलच व्हायरल होत आहे. (After breakup boyfriend gave breakup bill to his girlfriend as penalty news viral )
सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये एका तरुणाचं ब्रेकअप झालं आणि बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला ब्रेकअप बिल पाठवलं. हे विचित्र प्रकरण चीनमध्ये घडले असल्याचं समोर आले आहे.ज्यामध्ये ब्रेकअप केल्यामुळे मुलीला भलीमोठी शिक्षा मिळाली आहे. एका तरुणाच्या प्रेयसीने त्याच्याशी ब्रेकअप केलं. ज्यामुळे त्याने आपल्या गर्लफ्रेंडला ब्रेक अप बिल पाठवलं असून भारतीय चलनात या बीलाची रक्कम सुमारे 7 लाख रुपये होते. त्यामूळे मूलीला चांगलाच धक्का बसला आहे.
हे प्रकरण ऐकायला खूप मजेदार वाटत असले तरी ते खरंच घडले आहे. या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडवर केलेला खर्च एकत्र लिहून ठेवला आणि या खर्चाची भलीमोठी यादी हातावर ठेवत पैसे तिला परत करण्यास सांगितले आहे.या यादीत पाण्याच्या बाटलीपासून ते चिप्स आणि इतर स्नॅक्सपर्यंतचा हिशेबही या लिस्टमध्ये लिहिला आहे. परिस्थिती काहीही असो, पण वाचक मुलाच्या स्मरणशक्ती आणि सर्जनशीलतेचे लोक कौतुक करत आहेत.
व्यक्तीने तयार केलेल्या यादीत किरकोळ खर्चही लिहिला आहे. यामध्ये 2 पाण्याच्या बाटल्या आणि स्नॅक्सचा खर्चही समाविष्ट आहे. मुलीने एकटीने खाल्लेला नाश्ताही लिहिला आहे आणि जोडप्याचा खर्चही लिहिला आहे. रात्रीचे जेवण आणि जेवणाचा खर्च त्याने दोघांमध्ये अर्ध-अर्धा केला आहे. मुलीची आई आजारी पडली होती, तेव्हा रुग्णालयात दाखल करण्याचा खर्च आणि तिच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी देण्यात येणारा खर्च देखील या यादीत नमूद केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.