'सर्व काही मुलीसाठी'..!; १४ अपत्यांनंतरही कुणी वाट बघत का?

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

मुलगी जन्माला घालण्यासाठी या दाम्पत्याला तब्बल १४ अपत्यांची वाट पहावी लागली. १४ मुलांना जन्म दिल्यानंतर आता त्यांना मुलगी झाली असून आपण प्रचंड आनंदित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली

indian indian indian 

मुलगी नको म्हणणाऱ्या जगात मुलगी व्हावी म्हणून एक नव्हे, दोन नव्हे तब्बल १४ अपत्यांनंतरही ज्यांची प्रतीक्षा थांबली नाही असे दाम्पत्य पृथ्वीवर अस्तित्वात आहे असे कोणी म्हटल्यास एखाद्याला कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र, अमेरिकेतील केतेरी आणि जे स्क्वॉन्ड (Kateri and Jay Schwandt) हे दाम्पत्य याला अपवाद ठरले आहे. मुलगी जन्माला घालण्यासाठी या दाम्पत्याला तब्बल १४ अपत्यांची वाट पहावी लागली. १४ मुलांना जन्म दिल्यानंतर आता त्यांना मुलगी झाली असून आपण प्रचंड आनंदित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली
     
या जोडप्याला पहिल्यांदा आपल्याला मुलगी होणारच नाही, असे वाटलं होतं. त्यांना वाटले होते 15 वे अपत्यही मुलगाच असेल. त्यामुळे त्यांनी मुलगी झाली तर काय नाव ठेवायचे हे देखील ठरवले नव्हते. पण आता मुलगी झाल्यानंतर या दोघांनी या बाळाचे नाव मॅगी जेन ठेवलं आहे. मिशिगनमधील हे जोडपे कॉलेजकाळात गेलॉर्ड हायस्कूल आणि गेलॉर्ड सेंट मॅरी या कॉलेजमध्ये भेटले होते. त्यानंतर दोघांनी 1993 मध्ये लग्न केलं होतं. विशेष म्हणजे यांचं लग्न होण्यापूर्वी या जोडप्याला 3 मुलं झाली होती. त्यांनतर आता मॅगीच्या आगमनानंतर घरात 15वे अपत्य आले आहे.  

 याविषयी आनंदित होऊन मत व्यक्त करताना जे स्कॉन्ड म्हणतो की, 'मॅगीचं आमच्या कुटुंबात आगमन झाल्याने आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत. हे वर्ष आमच्यासाठी खूप गोष्टींमुळे लक्षात राहण्यासारखं आहे, कारण आज मॅगी आल्याने आमचं कुटुंब परिपुर्ण झालं आहे.' 

 या कुटुंबाातील सर्वात मोठे अपत्य टेलर हा आता 28 वर्षांचा आहे. या १५ मुलांच्या आईने अत्यंत आनंद व्यक्त केला असून एवढ्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता त्यांच्या चेहऱ्यावर  मुलगी झाल्याचे सुख पाहायला मिळणार आहे. 

संबंधित बातम्या