कोरोनाची लस घेण्याआधी आणि नंतर ''या'' पाच बाबींचा आहारात समावेश करावा; जाणून घ्या

Before and after getting the corona vaccine there are five things that should be included in the diet Find out
Before and after getting the corona vaccine there are five things that should be included in the diet Find out

देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सरकारच्या आणि सर्वसामान्यांच्या चिंतेचा विषय बनत चालला असताना लस घेण्या आधी  काय खावं आणि नंतर काय खावं ? वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक देश कोरोनाच्या लसीवर वेगाने काम करत आहेत. वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना कोरोना लस देण्यात येत आहे. दुसरीकडे लसीचे दुष्परीणाम देखील पाहायला मिळत आहे. लस घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रोत्साहित सुध्दा केले जाते आहे. परंतु लस  घेतल्यानंतर कोणता आहार घेतला पाहिजे हे सांगितले जात नाही. लस घेतल्यानंतर आहारामध्ये खालील गोष्टीचा समावेश करायला हवा. (Before and after getting the corona vaccine there are five things that should be included in the diet Find out)

हिरव्या भाज्या-

आपण आपल्या आहारात जास्तीत जास्त हिरव्या भाज्यांचा समावेश केला पाहिजे. जसे की पालक , ब्रोकोली, मेथी ,अशा हिरव्या भाज्यांचा समावेश आहारात करायला हवा. या भाज्यामध्ये  अँटीऑक्सीडेंटयुक्त असतात. त्या निगेटिव्ह एफेक्ट्सला लढा देऊन शरीराला मजबूत बनवतात. 

कांदा  आणि लसूण -
कडक उन्हापासून  होणाऱ्या त्रासापासून बचाव करण्यासाठी कांदा हा गुणकारी आहे. याचे आहारात सेवन केलंच पाहिजे. तसेच  आहारात लसूणचा वापर केल्याने शरीरातील विषाणू  नष्ट  होतात. कांदा  आणि लसूण  हे  प्रोबायोटिक्सयुक्त आहेत. हे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. यामुळे  रोजच्या आहारात  कांदा  आणि लसूण  यांचा समावेश असणे आवश्यक आहे. 
                    
हळद -

हळदीला गुणकारी औषध म्हणून ओळखले जाते. स्वयंपाक घरात तर हळदी शिवाय कोणता पदार्थ तयार होत नाही. हळदीचा अनेक प्रकारे उपयोग केले जातो. जखम झाल्यास हळदीचा ओषध म्हणून वापर केला जातो. तसेच हळदीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते  आणि सर्दी ,कफ झाले  असेल तर हळदीचा दूध त्यावर रामबाण उपाय आहे. 

सूप- 

प्रतिकारशक्ती  वाढविण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करणसाठी सूप महत्वाची भूमिका पार पडते. यामध्ये टमाटर सूप ,पालकसूप याचे सेवन करू शकतो. सूप घेण्याचे दोन फायदे आहेत, ते म्हणजे  शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते आणि सूप पिल्याने आरोग्य चांगले राहते. सूप पचनाला हलके असते तसेच आजारातून बरे होण्यास मदत करते.  सर्व खनिजे आणि जीवनसत्त्व असल्याने  आहारात सूप चे सेवन करणे आवश्यक आहे तसेच सूप घेतल्यानंतर रक्तदाबावर नियंत्रण राहते.  

 ब्लूबेरी-

ब्लूबेरी मध्ये मुबलक प्रमाणात अँटिओक्सीडेंट्स  आणि पोषक तत्वे  असतात . ब्लूबेरी मध्ये  कमी कॅलरीज असतात. त्यामध्ये असलेले फायबर, व्हिट्यामिन सी , व्हिट्यामिन क आणि  पोटॅशियम शरीरासाठी फायदेशीर ठरते. ब्लूबेरी चे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि ग्लुकोज नियंत्रित करण्यास मदत करते. सरकार कोविड -१९ व्हॅक्सीन घेण्याकरीता  जनजागृती करत आहे. या महामारीवर मात करण्यासाठी स्वत:ला जागरूक राहणं आवश्यक आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com