...आणि आत्‍महत्‍या करणार्‍या त्‍या मायलेकी वाचल्‍या.

dainik gomantak
रविवार, 17 मे 2020

पर्वरी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी.. सात वर्षांच्या मुलीलाही वाचविले
 

पर्वरी,

जुन्या मांडवी पुलावर आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एका महिलेला तिच्या सात वर्षाच्या मुलीसह पोलिसांनी वाचविले. 
या संबंधीचे सविस्तर वृत्त असे की, तोर्डा-बिठ्ठोण येथील एक महिला पतीच्या त्रासाला आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या करण्याच्या उद्देशाने जुन्या मांडवी पुलावर रेंगाळताना काही सतर्क तरुणांनी पाहिले व लगेच पोलिसांना कळविले. गस्तीवरील पोलिस हवालदार गणेश पार्सेकर आणि मार्कुस गोम्स यांनी लगेच मांडवी पुलाच्या दिशेने धाव घेतली व त्या महिलेला थांबविले व तिची समजूत काढून घरी नेऊन सोडले. 
तिचा पती काहीच काम धंदा करत नाही. त्यामुळे त्यांचे वरचेवर खटके उडत होते. त्यातूनच तिने ही टोकाची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला होता. सुदैवाने पोलिसांच्या सतर्कतेमुळे तिचा आणि तिच्या कोवळ्या मुलीचा जीव वाचला. आत्महत्येपासून परावृत्त करून महिलेसह एका मुलीचा जीव वाचविल्याबद्दल हवालदार गणेश पार्सेकर आणि चालक मार्कुस गोम्स यांचा पोलिस खात्यातर्फे बक्षीस देवून गौरव करण्यात आला.

 

संबंधित बातम्या