Apple Milkshake हाडांच्या आणि लिव्हरच्या आरोग्यासाठी फायदेशीर

घरीच अगदी कमी वेळात दूध आणि सफरचंद (Apple) मिक्स करून मिल्कशेक तयार करू शकता.
Apple Milkshake हाडांच्या आणि लिव्हरच्या आरोग्यासाठी फायदेशीर
Apple Milkshake is beneficial for bone and liver healthDainik Gomantak

सफरचंद (Apple) खाणे आरोग्यासाठी (health) लाभदायी असते. सफरचंदमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. तुम्ही सफरचंद चिरून खाण्यापेक्षा मिल्कशेक बनवून पिले तर आरोग्याला अधिक लाभ होतात. तुम्ही घरीच अगदी कमी वेळात दूध आणि सफरचंद(Apple) मिक्स करून मिल्कशेक तयार करू शकता. चवीसोबतच हे मिल्कशेक आरोग्यासाठी (Health) फायद्याचे ठरते. चल मग जाणून घेवूया मिल्कशेक (Milkshake) कसा बनवावा.

* साहित्य

  • सफरचंद - 2

  • दूध - 2

  • दालचीनी पावडर - 2 चिमूटभर

  • साखर- 2 चमचे

  • बदाम - 20

  • बर्फाचे तुकडे - 2

* कृती

* सर्वात पहिले सफरचंद स्वच्छ धुवावे. नंतर त्याला सोलून घ्यावे. हे चिरलेले सफरचंद मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.

* नंतर मिक्सरमध्ये दूध, साखर आणि बदाम टाकावे आणि चांगळे एकजीव करावे.

* यानंतर या मिश्रणात बर्फाचे तुकडे टाकावे. परत चांगले मिक्स करावे.

* सफरचंद मिल्कशेक सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. एका ग्लासमध्ये घेवून त्यात दालचीनी पावडर टाकावे.

Apple Milkshake is beneficial for bone and liver health
Health And Fitness Tips: कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक

* सफरचंद आरोग्यदायी

सफरचंद आरोग्यासाठी लाभदायी आहे. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फायबर, खनिजे आणि पोषक घटक असतात. यामुळे अनेक आजारांपासून आपल्याला दूर ठेवतात.

* कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात

सफरचंद नियमित खाल्ल्याने आरोग्य निरोगी राहते. ह्रदय आणि रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत चालते. यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो.

* लठ्ठपणा आणि वजन कमी होते

सफरचंद खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते. कारण सफरचंदमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. यात खनिज आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असल्याने वजन कमी होते. तसेच सफरचंदमध्ये असलेले व्हिटॅमिन के शरीरातील रक्ताभिसरण चांगले ठेवते.

Apple Milkshake is beneficial for bone and liver health
Health Tips: आता डेंग्यूला घाबरण्याची गरज नाही, फक्त या सोप्या प्रतिबंधक उपायांचे पालन करा

* त्वचेसाठी लाभदायी

सफरचंद खाणे आरोग्यासह त्वचेसाठी सुद्धा लाभदायी आहे. तुम्हाला जर त्वचा नितळ आणि निरोगी ठेवायची असेल तर सफरचंदाचे सेवन करावे.

* हाडे मजबूत होतात

हाडे मजबूत करण्यासाठी सफरचंद लाभदायी आहे. विशेषत: स्त्रियांसाठी सफरचंद खाणे गरजेचे आहे. कारण स्त्रियांचे हाडे कमकुवत असतात. सफरचंदाचे सेवन केल्याने हाड मजबूत होतात. तसेच अनेक आजारांपासून दूर ठेवते.

* लिव्हर चांगले राहते

सफरचंदमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हे नैसर्गिक डिटॉक्सिफायिंग एजंट म्हणून काम करते. यामुळे लिव्हर आणि पचनसंस्था सुरळीत काम करते. तसेच आतड्याचे आरोग्य चांगले राहते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com