घोरण्याच्या समस्येनं त्रासला आहात? घरगुती उपायांनी मिळेल सुटका

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

आपल्याला हे माहित असायला पाहिजे की, झोपेच्या वेळी घोरणे हे नैसर्गिक नसते. जर या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केले तर धोकादायक ठरू शकते. 

झोपताना स्नॉरिंग (घोरणे) ही एक सामान्य समस्या आहे. झोपताना श्वास घेण्यास अडचण होते. आपण जसे झोपायला जातो. तसेच आपल्या तोंडतून आणि नाकातून होणारा श्वाच्छोच्छवाच्या प्रवाहात काही प्रमाणात अडथळा निर्माण होतो. आणि यामुळेच एक विचित्र आवाज आपल्या नाकातोंडातून यायला लागतो. त्यालाच घोरणे म्हणतात. जरी घोरणाऱ्या व्यक्तीला त्याबद्दल माहिती नसेल, तरी जो माणूस त्याच्याबरोबर बाजूला झोपलेला असतो त्याची पूर्ण झोप उडून जाते. आपल्याला हे माहित असायला पाहिजे की, झोपेच्या वेळी घोरणे हे नैसर्गिक नसते. जर या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केले तर धोकादायक ठरू शकते. तेव्हा आपण वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांशी याबद्दल चर्चा केली पाहिजे. घोरण्याचा थेच संबंध आहे, जे नंतर हृदयाशी संबंधित अनेक आजारांचे कारण बनु शकते. परंतू ही जर का सुरवात असेल तर आपले हे घोरणे घरगुती उपायांनी कमी होवू शकते.

वजन कमी करणे महत्वाचे 

साधारणत: घोरण्याचे कारण सहसा गंभीर नसते, आपल्या जीवनशैलीमध्ये थोडा बदल करून हे दूर केले जाऊ शकते. जास्त वजन असणाऱ्यांना घोरण्याची समस्या जास्त असते. जर आपण आपल्या आयुष्यात हेल्दी अन्नासह नियमित वर्कआउट केले तर आपले वजन कमी होवू शकते. आणि घोरण्यापासून कायमची सुटका होवू शकते.

अदरक आणि मधाचा चहा घ्या

अदरक एक एंटी इंफ्लेमेटरी और एंटीबैक्टीरियल म्हणून कार्य करते जे घोरण्यापासून कायमची सुटका करू शकते. अदरक  हे एक सुपरफूड आहे आहे जे अपचन आणि खोकला यासारख्या अनेक आरोग्यविषयक समस्यांवर उपचार करू शकते.  आपण जर घारण्यासारख्या समस्येमुळे त्रस्त असाल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी दिवसातून दोनदा अदरक आणि मधाचा चहा प्या,  हे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

अननस, केळी आणि संत्री खा

जर आपल्या झोपेची क्वॉलिटी सुधारली तर तुम्हाला घोरण्यापासून आराम मिळू शकेल. आपली चांगली आणि शांत झोप शरीरात मेलाटोनिनचे प्रमाण वाढवते. मेलाटोनिन खरं तर एक हार्मोन्स आहे ज्यामुळे आपल्याला झोप येते. अशा परिस्थितीत आपण जास्त प्रमाणात मेलाटोनिन असलेले पदार्थ खावे.  अननस, केळी आणि संत्रामध्ये भरपूर प्रमाणात मेलाटोनिनचे प्रमाण असते. या फळांचा खाण्यात वापर करून घोरण्यापासून नेहमीपासून सुटका मिळू शकते.  आणि आपल्याला व शेजारच्याला चांगली झोप लागू शकते.

सायकल चालवण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का ? 

 

 

संबंधित बातम्या