Astrology Tips : जीवनात 'या' 5 गोष्टी नियमित केल्यास उजळेल नशीब

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात सुख आणि समृद्धी हवी असते.
For Better Life
For Better LifeDainik Gomantak

प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात सुख आणि समृद्धी हवी असते. त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करून आपल्या कुटुंबाला आणि स्वतःला सुखी ठेवण्याचा प्रत्येकजण सर्वतोपरी प्रयत्न करतो. परंतु कठोर परिश्रम करूनही अनेकांना त्याचे सकारात्मक परिणाम मिळत नाहीत आणि सतत समस्या येतात. या त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया हे 5 उपाय आहेत, ज्याद्वारे आपले नशीब उजळू शकते.

For Better Life
Drinking Facts : मद्य पिण्यापूर्वी Cheers का बोलतात, जाणून घ्या कारण

1. जेवताना दिशा लक्षात ठेवा

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हाही तुम्ही अन्न खाता तेव्हा तुमचे तोंड पूर्वेकडे असावे. पूर्वेकडे तोंड करून अन्न खाल्ल्याने जीवन आनंदी होते. जेवताना चप्पल घालून बसू नये. याशिवाय ज्यांच्यासाठी तुम्हाला अन्न मिळत आहे त्यांचे आभार मानायला विसरू नका.

2. घरात गंगाजल शिंपडावे

ज्योतिष शास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपर्‍यात नियमितपणे गंगाजल शिंपडल्यास नकारात्मक ऊर्जा संपते. याशिवाय घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.

3. सकाळ संध्याकाळ मंदिरात दिवा लावा

घरामध्ये नियमितपणे पूजा करून दिवा लावावा. तसेच रविवारी उंबराच्या झाडाची मुळं आणून त्याची विधिवत पूजा करून तिजोरीत किंवा पैसा ठेवलेल्या ठिकाणी ठेवा.

4. वाहत्या पाण्यात वाळलेली फुले तरंगवा

ज्योतिष शास्त्रानुसार पूजागृहात अर्पण केलेली फुले सुकवल्यानंतर आदरपूर्वक वाहत्या नदीत किंवा वाहत्या पाण्यात वाहून द्या. घराच्या आजूबाजूला पाणी असणारी जागा नसेल तर एखाद्या ठिकाणी खड्डा खणून तिथेच सोडावे.

5. सकाळी उठून तोंड स्वच्छ धुवा

धार्मिक मान्यतांनुसार, सकाळी उठल्यावर दात घासणे किंवा तोंड स्वच्छ धुणे आवश्यक आहे. त्यानंतरच कोणत्याही प्रकारचे अन्न सेवन करावे. आंघोळ न करता धार्मिक ग्रंथ आणि मूर्तीला हात लावणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घरातील समृद्धी कमी होऊ लागते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com