Athiya Shetty Beauty Tips: ब्युटीफुल आथिया शेट्टीने सांगितला आपल्या ग्लोइंग स्किनचा फंडा

Athiya Shetty: अभिनेत्री आथिया शेट्टी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी व्हिटामिन-ई कॅप्सुलचा वापर करते.
Athiya Shetty
Athiya ShettyDainik Gomantak

Athiya Shetty: प्रत्येक व्यक्ती आपली त्वचा चांगली आणि निरोगी राखण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असते. रोजच्या धावपळीत स्किनची काळजी घ्यायला फार वेळही कोणाकडे नसतो. त्यामुळे मग सोपे आणि पटकन करता येतील असे काहीतरी उपाय आपण शोधत असतो. चला तर मग असेच मस्त ब्युटी सिक्रेट अभिनेत्री आथिया शेट्टीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहे. ते आपण जाणून घेऊयात.

आथिया शेट्टी आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी व्हिटामिन-ई कॅप्सुल वापरण्याचा सल्ला देते. आथिया व्हिटामिन-ई कॅप्सुल हलक्या हाताने आपल्या स्किनवर लावते. मग थोडा वेळ सूर्य प्रकाशात थांबते. आथिया शेट्टीने (Athiya Shetty) शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, व्हिटामिन-ईमुळे त्वचा मुलायम होते.

Athiya Shetty
Stomach Pain Causes : पोटदुखीने त्रस्त असाल तर उपचार करण्यापूर्वी जाणून घ्या त्याची कारणे

व्हिटामिन-ई कॅप्सुलमध्ये भरपूर एंटी- ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमची त्वचा (Skin) निरोगी राहते, असं आथिया शेट्टी म्हणाली आहे. तुम्ही पण आपल्या डेली रुटीनमध्ये चेहऱ्याला तजेलदार व सुंदर बनवण्यासाठी व्हिटामिन-ई कॅप्सुलचा वापर करु शकता.

Athiya Shetty
Athiya ShettyDainik Gomantak

तुम्ही व्हिटामिन-ई कॅप्सुल कोणत्याही तेलात मिक्स करुन स्किनवर लावणं टाळा. ते ऑइली स्किनला हानिकारक असते. जर तुमची ड्राय स्किन असेल तर गुलाब पाण्याचा वापर करुन तुम्ही स्किन मसाज करु शकता. कमी वेळात आणि कमी खर्चात होणाऱ्या या उपायांचा वापर करुन तुम्ही आपल्या त्वचेची छान काळजी घेऊ शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com