ओल्या केसांमध्ये हेयरस्प्रे करणे टाळा

केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ओल्या केसांमध्ये हिटिंग टूल्स वापरू नये.
ओल्या केसांमध्ये हेयरस्प्रे करणे टाळा
Avoid hairspray in wet hairDainik Gomantak

प्रत्येक महिलांना लांब आणि सुंदर केस (Hair) हवे असतात. केसांची योग्य काळजी घेण्यासाठी काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. केसांचे आरोग्य दीर्घकाळ चांगले ठेवण्यासाठी ओल्या केसांमध्ये पुढील गोष्टी करणे टाळावे.

* हेयर स्प्रेचा वापर टाळावा

केसांचे (Hair) सौंदर्य वाढवण्यासाठी आपण हेयर स्प्रेचा वापर करतो. पण ओल्या केसांमध्ये हेयर स्प्रे करू नये. कारण यामुळे केस कोरडे पडू शकतात. तसेच केसांचा आकार काही काळानंतर बदलू शकतो.

* केस सुकवणे

अनेक लोकांना केस (Hair) वाळवणे ही एक नैसर्गिक पद्धत आहे असे वाटते. पण हा एक् मोठा गैरसमज आहे. केस हवेत सुकवल्याने केस अधिक गळू शकतात. तसेच केस टॉवेलने घासून कधीच सुकवू नये, कारण केस तुटण्याची शक्यता अधिक असते.

Avoid hairspray in wet hair
Hair Care Tips: हेयर हीटिंग टूल्समुळे खराब झालेल्या केसांवर करा 'हे' उपाय

* ओले केस बांधणे

ओले केस बांधणे केसांच्या (Hair) आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे केस कमकुवत होऊन गळू शकतात. यामुळे ओल्या केसांमध्ये हेयर स्टाइल करणे टाळावे.

* ब्लो ड्राय करणे टाळा

ओल्या केसांमध्ये (Hair) ब्लो ड्राय करणे टाळावे. असे केल्यास केस अधिक कोरडे होऊ शकतात. ब्लो ड्राय करतांना त्याची सेटिंग मिडियम ठेवावी.

Related Stories

No stories found.