coronavirus: फुफ्फुस निरोगी राहण्यासाठी या गोष्टी टाळा

दैनिक गोमंतक
सोमवार, 3 मे 2021

थोडे काम केल्याने किंवा पायऱ्या चढउतार केल्याने देखील धाप लागत असेल तर आपले फुफ्फुस कमकुवत आहे असे समजावे. त्यामुळेच फुफ्फुसची काळजी घेणे गरजेच आहे. यासाठी काही गोष्टीपासून दूर राहणेच योग्य आहे.  

आपल्या शरीराचा महत्वाचा भाग म्हणजे, फुफ्फुस आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशात हाहाकार सुरू झाला आहे. यामूळे दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाचा रुग्णांची संख्या जसी वाढत आहे तसे, कोरोना लसीकरणही वाढत आहे. परंतु फक्त लासिकरन करून चालणार नाही. काही घरगुती उपाय कींवा काही गोष्टी टाळल्या तर स्वतःचे रक्षण करू शकतो. कोरोना विषाणूपासून रक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे गराजेचे आहे. (Avoid these things to keep the lungs healthy) 

फुफ्फुस चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर शरीर सुदृढ राहते. कारण फुफ्फुसातून हवा फिल्टर होऊन पूर्ण शरीराला ऑक्सीजन मिळतो. मात्र आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीकारण फुफ्फुसावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे शारीरिक आजार निर्माण होऊ शकतात. थोडे काम केल्याने किंवा पायऱ्या चढउतार केल्याने देखील धाप लागत असेल तर आपले फुफ्फुस कमकुवत आहे असे समजावे. त्यामुळेच फुफ्फुसची काळजी घेणे गरजेच आहे. यासाठी काही गोष्टीपासून दूर राहणेच योग्य आहे.            

*अनेकांना मद्यपान करण्याची सवय असते. त्यामुळे फुफ्फुसाचे आणि यकृतामध्ये बिघाड होऊ शकतो. तसेच दम्याचा त्रास देखील कमी होऊ शकतो. 

*  आहारात मीठाचे प्रमाण संतुलित ठेवावे. फुफ्फुसांसाठी हे धोकादायक आहे.     सोडियमचा अधिक वापर केल्याने दम्याचा त्रास होऊ शकतो.

* जास्त तेलकट पदार्थ खाणे आरोग्यसाठी घातक असते. यामुळे बँड  कोलेस्ट्रॉल, चरबी आणि हृदयाचे आजार होऊ शकतात. 

* अनेकांना गॅसेसचा त्रास असतो तसेच लठ्ठपणामुळे फुफुसावर वाईट परिणाम होतात. कोबी आणि ब्रोकोली मध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात. परंतु त्यांचे 
अतिसेवन शरीराला घटक ठरू शकते.  

Immunity Booster Food : कोरोनाकाळात पैसे वाचवा, घरच्या घरी पौष्टिक खा - 

* दूध, दही, पनीर, इत्यादि दुग्धजन्य पदार्थ शरीरसाठी चांगले असतात. परंतु अतिसेवण करणे घातक ठरू शकते. यामुळे कफ चा त्रास उद्भवू  शकतो. दुधामध्ये असलेल्या कॅसोमोर्फिन तत्वामूळे काफचा त्रास होतो. 

* आंबट पदार्थाच्या अतिसेवणमूळे असिडिटीचा त्रास होतो. यामुळे फुफ्फुसाचे आजार निर्माण होऊ शकतात.       

* सॉफ्ट ड्रिंक मध्ये साखरेच प्रमाण जास्त असते. त्यामुळे फुफ्फुसांवर वाईट परिणाम  होतो. तसेच ब्राँकायटिस समस्येला तोंड द्यावे लागते.

पुढील गोष्टी केल्याने फुफ्फुस निरोगी राहते 

* फुफ्फुस निरोगी राहण्यासाठी नियमित लसूण खावे. 
* नियमित तुळशीचे पान खाल्याने फुफ्फुस निरोगी राहते. 
* फुफ्फुस निरोगी राहण्यासाठी प्राणायाम सारखे व्यायाम करां.     

 

संबंधित बातम्या