मासिक पाळी दरम्यान होतोय खूप त्रास, तर 'या' आयुर्वेदिक टिप्स करा फॉलो

लक्षणे गंभीर दिसू लागल्यास, तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
ayurvedic expert tips to get rid of period pain
ayurvedic expert tips to get rid of period painDainik Gomantak

मासिक पाळी ही महिलांमध्ये एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यांचे चक्र 28 ते 35 दिवसांच्या दरम्यान असते. मासिक पाळीच्या पहिल्या तीन दिवसांत स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदनांचा त्रास होतो. मासिक पाळीत काही वेदना होणे हे सामान्य आहे, परंतु जास्त वेदना होणे हे शरीरातील अशक्तपणा दर्शवते. वैद्यकीय भाषेत या काळात होणाऱ्या वेदनांना डिसमेनोरिया म्हणतात.

मासिक पाळीत महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कुणाला पोटदुखीची तक्रार असेल, तर कुणाला पाठदुखी किंवा पाय दुखत असतील. काही स्त्रियांना या काळात मळमळ, सूज येणे, आणि वेदना होतात. या वेदनापासून मुक्त होण्यासाठी, महिला अनेकदा वेदनाशामकांचा अवलंब करतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यालाही (Health) अनेक वेळा हानी पोहोचते.

ayurvedic expert tips to get rid of period pain
बॉयफ्रेंड असो किंवा नवरा, मुली 'ही' 5 रहस्य लपवतातचं

जर तुम्हाला दर महिन्याला होणाऱ्या मासिक पाळीच्या दुखण्याने त्रास होत असेल तर आयुर्वेदिकानुसार तुम्ही या समस्येपासून प्रभावीपणे सुटका मिळवू शकता. आयुर्वेदिक पद्धतीने मासिक पाळीचा उपचार कसा करावा हे तज्ञांकडून जाणून घेऊया.

पीरियड वेदनांचे कारण : आयुर्वेदानुसार मासिक पाळीत वेदना हा वात दोष आहे. वात दोष खालच्या दिशेने सरकतो जो मासिक पाळीत रक्ताच्या मुक्त प्रवाहासाठी जबाबदार असतो. जेव्हा शरीरात तीव्र क्रिया असते तेव्हा वात दोष वाढतो आणि रक्तस्त्राव होण्याची समस्या उद्भवू शकते.

शारीरिक ताण कमी करा.

आहारात (diet) आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा. फायबर समृध्द अन्न खा.

या त्रासात दिवसभर सतत कोमट पाणी प्यावे.

हळदीचे मटारच्या आकाराचे छोटे गोळे करून पाण्यात सेवन करा. हे हळदीचे गोळे पहिल्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापर्यंत रिकाम्या पोटी घेण्याचे लक्षात ठेवा.

या दरम्यान विश्रांती घ्या आणि साधे अन्न खा. आहारात भात, सूप आणि भाजलेल्या भाज्यांचा समावेश करा.

मासिक पाळीच्या सामान्य लक्षणांवर तुम्ही घरच्या घरी सहज उपचार करू शकता, परंतु लक्षणे गंभीर दिसू लागल्यास, तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा (doctor) सल्ला घ्यावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com