Bad Cholesterol: 'ही' फळं नसांमध्ये जमलेले खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने करते कमी

आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये कोलेस्टेरॉलची समस्या वाढत आहे.
Bad Cholesterol
Bad CholesterolDainik Gomantak

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि सकस आहाराकडे दुर्लक्ष केल्याने कोलेस्ट्रॉलची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ रक्तात असतो. साधारणपणे आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल आढळतात. ज्याला चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात.

चांगले कोलेस्टेरॉल रक्तात जमा होणारी चरबी कमी करण्यास मदत करते आणि आपल्या धमन्या स्वच्छ ठेवते ज्यामुळे हृदयाकडे रक्ताचा प्रवाह योग्य प्रकारे होऊ शकतो. खराब कोलेस्ट्रॉल खूप आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते.

जेव्हा त्याची पातळी वाढते, तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये गोठण्यास सुरुवात होते, ज्यामुळे हृदयाकडे जाणारा रक्त प्रवाह लक्षणीय प्रमाणात कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका, स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खाण्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. यामध्ये जंक फूड, तळलेले पदार्थ यासारख्या पदार्थांचा समावेश होतो. दुसरीकडे, फायबरयुक्त फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा आहारात (Diet) समावेश करून वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी केली जाऊ शकते. काही फळांमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यापासून रोखता येते.

  • एव्होकॅडो

रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांनी एव्होकॅडोचे सेवन आवश्यक आहे. एवोकॅडोमध्ये व्हिटॅमिन के, सी, बी5, बी6, ई आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते, जे तुमचे हृदय (Heart) निरोगी ठेवण्यास आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करते. एवोकॅडो शरीरातील चांगल्या आणि वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी देखील नियंत्रित करते.

  • टोमॅटो

टोमॅटोमध्ये अनेक पोषक घटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, के आणि सी आढळतात. जे त्वचा (Skin) , डोळे आणि हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याशिवाय यामध्ये पोटॅशियमही भरपूर प्रमाणात आढळते. हे कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि स्टोकचा धोका कमी करते.

Tomato
TomatoDainik Gomantak
  • सफरचंद

डॉक्टर रोज एक सफरचंद (Apple) खाण्याचा सल्ला देतात कारण ते खाल्ल्याने अनेक आजारांचा धोका कमी होतो. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. सफरचंदात पेक्टिन नावाचे फायबर आढळते जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यासोबतच हे हृदयाच्या (Heart) स्नायू आणि रक्त पेशींना नुकसान होण्यापासून वाचवते.

  • आंबट फळे

लिंबू, संत्री आणि द्राक्ष यांसारखी लिंबूवर्गीय फळे देखील तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. लिंबूवर्गीय फळांमध्ये हेस्पेरिडिन असते, जे उच्च रक्तदाब, स्ट्रोक आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. याशिवाय लिंबूवर्गीय फळांचे सेवन केल्याने महिलांमध्ये (Women) स्टोकचा धोकाही लक्षणीयरीत्या कमी होतो.

Fruits
FruitsDainik Gomantak
Bad Cholesterol
Health Care Tips: 'या' कारणामुळे कोट्यवधी लोकांचे कमजोर होतंय हृदय, WHOने दिला इशारा
  • पपई

पपईमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासोबतच ते खराब कोलेस्ट्रॉलही कमी करते. मोठ्या पपईमध्ये 13 ते 14 ग्रॅम फायबर असते. रोज पपई खाल्ल्याने पचनक्रिया देखील सुधारते.

Papaya
PapayaDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com