Bad Habit: रात्री-अपरात्री उठून या गोष्टी खात असाल तर व्हा सावध

रात्री-अपरात्री उठून पदार्थ खाल्यास पचणसंस्थेवर ताण येतो.
Bad Habit: रात्री-अपरात्री उठून या गोष्टी खात असाल तर व्हा सावध
Bad Habit: रात्री-अपरात्री उठून या गोष्टी खात असाल तर व्हा सावध Dainik Gomantak

अवेळी खाण्याच्या सवयीमुळे (habits) आपल्या आरोग्यास (Health) धोका निर्माण होऊ शकतो. अनेक लोकांना रात्री उशिरा खाण्याची सवय असते. या सवयीमुळे त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. चला तर मग जाणून घेवूया रात्रीच्या वेळी कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे.

* फळे

आपली पचनशक्ती रात्रीच्या वेळी मंद होते. यामुळे रात्री फळे खाल्यास पचत नाहीत. तसेच रक्तातील साखरेत वाढ होण्याची शक्यता असते. नेहमी फळे झोपेच्या 2 तासापूर्वी खावीत. निरोगी आरोग्यासाठी रात्री -अपरात्री फळे खाणे टाळावे.

Bad Habit: रात्री-अपरात्री उठून या गोष्टी खात असाल तर व्हा सावध
Monsoon Health Care: मासे खातायं? आधी ही बातमी वाचा

* जंक फूड

पिझ्झा, बर्गर, चिप्स यासारख्या पदार्थांमध्ये तेल, फॅट आणि कृतिम साखरेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे पदार्थ पचवण्यास जड असतात. जर तुम्ही या पदार्थांचे सेवन रात्री केल्यास पोटा संबंधित आजार उद्भवू शकतात. यामुळे रात्रीच्या वेळी जंक फूड खाणे टाळावे.

Coffee
Coffee Dainik Gomantak

* कॉफी

रात्रीच्या वेळी चहा किंवा कॉफी पिल्यास झोप येत नाही. कॅफी शरीराला उत्तेजित करण्याचे काम करते. एका संशोधनानुसार असे लक्षात आले की झोपण्यापुर्वी 2 किंवा 3 तासापूर्वी कॉफी घेतल्यास झोपेवर परिणाम होतो.

Bad Habit: रात्री-अपरात्री उठून या गोष्टी खात असाल तर व्हा सावध
Skin Care Tips: सन टॅनवर उपचार करण्याचे सर्वोत्तम मार्ग

* आइसक्रीम

रात्री आइसक्रीम खाल्ल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतो. कारण यात कॅलरीजच प्रमाण अधिक असते. यामुळे झोपेवर परिणाम होतो. तसेच पचणसंस्थेवर देखील परिणाम होतो.

Tomato
Tomato Dainik Gomantak

* टोमॅटो

टोमॅटोमध्ये अमिनो अॅसिडचे प्रमाण भरपूर असते. यामुळे मेंदू सक्रिय होतो. जर तुम्ही रात्रीच्या वेळी टोमॅटो खात असाल तर तुमच्या झोपेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण असल्याने अॅसिडिटी वाढून जळजळ होण्याची समस्या निर्माण होऊ शकते .

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com