Astro Tips: हातातून 'या' 5 गोष्टी निसटल्यास होऊ शकते आर्थिक नुकसान

ज्योतिष शास्त्रानुसार काही गोष्टी हातातून निसटून जमिनीवर पडणे खूप अशुभ मानले जाते.
Astro Tips| milk
Astro Tips| milkDainik Gomantak

अनेकदा घरातून घाईघाईने बाहेर पडतांना काही वस्तू हातातून घसरून जमिनीवर पडतात. ज्योतिष शास्त्रानुसार काही गोष्टी हातातून निसटून जमिनीवर पडणे खूप अशुभ मानले जाते. खरं तर, ते एखाद्या व्यक्तीच्या कामात बिघाड, अपयश किंवा आर्थिक नुकसान होण्याचे लक्षण आहे. जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट आपल्या हातातून निसटून जमिनीवर पडते तेव्हा त्याचा अर्थ काय ते आपण जाणून घेऊया. (bad omen in auspicious sings if these 5 things fall down from hand in house)

* स्वयंपाकघर किंवा जेवणाच्या टेबलावर हातातून मीठ पडल्यास ते शुक्र आणि चंद्र कमजोर होण्याचे लक्षण आहे. हे लोकांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येण्याचे लक्षण असु आहे. अशा लोकांचे जोडीदारासोबत नेहमीच मतभेद होतात.

* जर तुमच्या हातातून दुधाचा (Milk) पेला जमिनीवर पडला किंवा दुध उकळल्यानंतर भांड्यातून बाहेर पडला, तर हे देखील खूप अशुभ लक्षण आहे. दुधाचा संबंध चंद्राशी आहे असे मानले जाते. दुध खाली पडणे हे जीवनातील आर्थिक संकटाचे लक्षण असल्याचे ज्योतिष तज्ज्ञाचे म्हणने आहे.

Astro Tips| milk
Keto Diet: जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी केटो डाएट करत असाल तर 'बटर कॉफी' सर्वोत्तम

* खातांना (Food) किंवा सर्व्ह करताना तुमच्या हातातून अन्न वारंवार पडत असेल तर त्याचे दोन विशेष अर्थ होऊ शकतात. प्रथम, एकतर तुमच्या घरी पाहुणे येणार आहे. आणि दुसरे म्हणजे, काही नकारात्मक ऊर्जा किंवा गरिबी तुमच्या घरावर येत आहे. वास्तू दोषांच्या कारणांमुळेही असे होऊ शकते.

* जर तुमच्या हातातून वारंवार तेल पडत असेल तर ही देखील मोठी चिंतेची बाब ठरू शकते. हातातून वारंवार तेल पडणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात मोठी समस्या येणार आहे. एवढेच नाही तर व्यक्ती कर्जबाजारी होण्याचे लक्षण असु शकते. असे लोक लाख प्रयत्न करूनही कर्जमुक्त होऊ शकत नाहीत.

* जर तुमच्या हातातून पूजेचे ताट पुन्हा पुन्हा पडत असेल तर ते अत्यंत अशुभ लक्षण आहे. याचा अर्थ देव तुमच्यावर दयाळू नाही. उपवास, उपासनेचा लाभ मिळत नाही. हे भविष्यात मोठ्या समस्येचे लक्षण देखील असू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com