जास्वंदिचे सुंदर फूल असेही गुणकारी

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

बागेत लाल जास्वंदिचे सुंदर फूल आपल्याला बघायला मिळते गणपती ला वाहण्यासाठी हे फूल शुभ मानले जाते. हे फूल दिसायला जेवढे सुंदर आहे तेवढेच गुणकारी सुद्धा आहे.

बागेत लाल जास्वंदिचे सुंदर फूल आपल्याला बघायला मिळते गणपती ला वाहण्यासाठी हे फूल शुभ मानले जाते. हे फूल दिसायला जेवढे सुंदर आहे तेवढेच गुणकारी सुद्धा आहे. आरोग्यासाठी अनेक बाबतीत फायदेशीर आहे. शतकानुशतके रोगांच्या उपचारासाठी आयुर्वेद आणि चिनी औषधात या फुलांचा उपयोग केला जातो.   हर्बल टी म्हणून आपण या फुलांपासून चहा तयार करू शकतो. आणि याचा लाभ आपल्या आरोग्यासाठी शकतो. या चहामध्ये व्हिटॅमिन सी आणि ए, जास्त असतं त्याचबरोबर बरेच खनिजेसत्व ही यात असतात. अँटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सीने हे फुल समृद्ध असल्याने  आपल्या केस आणि त्वचेसाठी देखील चांगले फायद्याचे आहे.

आता या फुलांपासून तयार केलेल्या चहाचे काय फायदे आहे ते आपण जाणून घेऊया

वजन कमी करण्यास मदत

या चहाचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पोषक, फ्लेव्होनॉइड्स आणि विविध खनिजे या फुलात असल्याने त्या चहात घातलेला गूळ शरीरातील चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करते. यात बरेच अँटीऑक्सिडेंट देखील आहे, ज्याने आपल्या पचनशक्तीमध्ये  वाढ होते. आणि या सर्व कारणांमुळे वजन कमी होण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रित करते;
या फुलांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे रक्तदाब पातळी कमी राहण्यास मदत होते.  जे रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त ठरते.

नैराश्य आणि चिंता दूर करा
जास्वंदिच्या फुलांमध्ये अँटी-डिप्रेससंट गुणधर्म आहेत जे चिंता, नैराश्या आणि तणावची लक्षणे दूर करण्यास मदत करतात. त्यात असलेले फ्लेव्होनॉइड्स मज्जासंस्थेला नियंत्रित ठेवते आणि नकारात्मक विचारांना आपल्यापासून दूर ठेवते. अशा परिस्थितीत, जर आपण दु: खी किंवा वाईट विचार करत असाल तर एक कप हिबिस्कस चहा पिऊन बघा तूम्हाला नक्कीच चांगल वाटेल. 

रोग प्रतिकारशक्ती वाढवते 

या चहामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदात हे फुल एक महत्त्वाचे औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. ते फक्त एंटी-बैक्‍टीरियल आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांसाठी.  हा चहा आपला  सिजनल फ्लूपासून देखील बचाव करू शकतो.

केस आणि त्वचेसाठी चांगले
व्हिटॅमिन ए आणि सी बरोबरच त्यात अमीनो एसिड देखील असते जे केस गळती थांबवते आणि केसांची वाढ करते. तसेच ड्रैंडफ कमी करते. केसांबरोबरच हा चहा त्वचेसाठीही चांगला आहे. अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी परिपूर्ण असल्याने, अतिनील किरण, प्रदूषण यामुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करते. हा चहा चेहऱ्यावरील सुरकुत्या टाळण्यास देखील मदत करते, ज्यामुळे आपली त्वचा वर्षानुवर्षे तरुण आणि निरोगी दिसते.

कृती
2 कप पाण्यात 2 ते 3 चमचे वाळलेल्या जास्वंदिच्या फुलांच्या पाकळ्या घाला. 5 मिनिटे उकळवा. ते गाळून घ्या आणि चवीनुसार त्यात मध आणि लिंबाचा रस घाला. आणि 2 मिनिटात उत्तम चहा तयार.

संबंधित बातम्या