Beauty Care Gadget: घरच्या घरी करा पार्लर ट्रीटमेंट
Beauty Care gadgetDainik Gomantak

Beauty Care Gadget: घरच्या घरी करा पार्लर ट्रीटमेंट

हे 5 Beauty Gadget तुमच्याकडे असल्याच पाहिजेत.

आजकाल सगळ्यांना सुंदर (Beautiful) दिसायला आवडत. सुंदर दिसण्यासाठी स्त्रियांचे (women) अतोनात प्रयत्न असतात, आपण आपल्या परीने सौंदर्याची काळजी घेतच असतो मग त्यामध्ये चेहऱ्याची निगा आली, केसांची (Hair) निगा आली, नखांची निगा आली, त्वचेची (Skin) निगा आली. पूर्वीच्या मनाने आता स्वतःची काळजी घेणं आणखीनच सोपे झाले आहे. कारण बाजारात तसे गॅजेट्स (Beauty Care gadget) उपलब्ध झाले आहेत. त्यांचा वापर करून आपण आपले काम आणखीनच सोपे करू शकतो. या आधी आपल्याला प्रत्येक गोष्टी साठी पार्लर किंवा सलून ची पायरी चाढावी लागत होती,पण आता तुम्ही घरच्या घरी पार्लर ट्रीटमेंट घेऊ शकता. आणि हो यासाठी तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज नाही.

Beauty Care gadget
National Nutritious Week 2021: सकस आहारकडे दुर्लक्ष करू नका

अचानक तुम्हाला कोणत्यातरी कार्यक्रमाला किंवा समारंभाला जायचे आहे. आणि तुम्ही काहीच रेडी नाही आहात, पार्लर ला जाण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये? तर मग या 5 वस्तु तुमच्याकडे असल्याच पाहिजेत.

1. फेशियल मसाजर :

फेशियल मसाजर आजकाल बाजारात सहज उपलब्ध होतो तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता. या मध्ये तुम्हाला 5 प्रकारचे आपलायन्स मिळतात. यामध्ये तुम्हाला स्क्रबिंग साठी ब्रश, मसाज साठी मसाजर, क्लिनिंग साठी स्पज, आणि क्लिनिंग स्टोन या सर्व गोष्टींचा या मध्ये समावेश असतो हे किट वापरण्याची पद्धत त्यावर लिहिलेली असती.

2. एपिलेटोर/ ट्रीमर :

हे हेअर रीमूवर गॅजेट्स आहेत, याचा वापर करून तुम्ही नको असलेले केस काढू शकता, हे एक प्रकारचे मशीन असते. हे सेल वर चालते यामधील एपिलेटोर हे तुमचे केस मूळापासून काढते तर ट्रीमर हे वर वर चे केस काढते. बाजारात गॅजेट्सची मागणी वाढत आहे.

Beauty Care gadget
Brain Health: जंक फूडसह या 4 पदार्थांमुळे होऊ शकते Memory Loss

3. ब्लॅकहेड/ व्हाइटहेड रीमूवर

या मुळे तुम्हाला जर ब्लॅकहेड किंवा व्हाइटहेड चा त्रास असेल तर तुम्ही या गॅजेट्सचा वापर नक्की करा, याची तुम्हाला मदत होईल. हे गॅजेट्स ब्लॅकहेड किंवा व्हाइटहेड असेल त्या ठिकाणी ठेऊन सुरू करा हे मूळापासून तुमचे ब्लॅकहेड किंवा व्हाइटहेड काढेल. आणि तुमचे पोर्स मोकळे होतील.

4. हेअर मसाजर :

आठवड्यातून किमान दोन वेळा तरी हेअर मसाज घेतला पाहिजे. केसासाठी आपण हाताने केलेल्या मसाज व्यतिरिक्त हेअर मसाजर ने केलेला मसाज सुद्धा अधिक परिणाम कारक ठरू शकतो. हा मसाजर हेअर ब्रश च्या स्वरूपात येतो हा तुम्ही कंगव्यासारखा वापरू शकता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com