Beauty Tips: झोपण्यापूर्वी 'या' 5 ब्युटी टिप्स अवश्य फॉलो करा, त्वचा राहील चमकदार

झोपण्यापूर्वी तुम्ही या ब्युटी टिप्स फॉलो केल्यास त्वचा चमकदार राहील
Beauty Tips
Beauty TipsDainik Gomantak

झोपण्यापूर्वी थकव्यामुळे अनेक लोक आपल्या त्वचेसाठी काही करू शकत नाहीत. परंतु ही सवय थोडी बदलली तर खूप फायदा होऊ शकतो. दिवसभराच्या धावपळीमुळे त्वचेच्या दिनचर्येकडे लक्ष दिले जात नाही. पण रात्री झोपताना चेहऱ्याची काळजी घेतल्यास चमक कायम राहु शकते.

काही स्त्रिया दिवसभर आपल्या त्वचेची (Skin) योग्य काळजी घेतात. परंतु रात्री शारीरिक थकव्यामुळे त्या त्याकडे दुर्लक्ष करून झोपी जातात. परंतु तुम्हाला माहित आहे का की आपण रात्री झोपत असताना देखील आपल्या शरीराचे अवयव त्यांचे काम करतात. जर तुम्हाला तुमची त्वचा नेहमी चमकदार असावी आणि त्वचेशी संबंधित सर्व समस्यांपासून नेहमी दूर राहायचे असेल, तर झोपण्यापूर्वी तुम्हाला या 5 गोष्टी कराव्या लागतील.

Beauty Tips
National Chocolate Chip Cookie Day 2022: चॉकलेट आरोग्यासाठी किती फायद्याचे?

* चेहरा पाण्याने धुवावा

त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टी करणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि चमकू शकते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे आणि त्यात सर्वात पहिली गोष्ट येते, चेहरा स्वच्छ पाण्याने धुणे. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.

* हर्बल फेस मास्क

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर (Face) लावलेला हर्बल फेस मास्क हा त्वचेला निरोगी आणि पोषक ठेवण्याचा उत्तम उपाय आहे. त्याचा वापर केल्याने त्वचेतील पोषक तत्वांसह आर्द्रता पुन्हा भरून निघते. जे तुमच्या त्वचेसाठी प्रत्येक प्रकारे योग्य आहे. उन्हाळ्यात तुम्ही मुलतानी, काकडी किंवा चंदन पावडर लावू शकता.

* डोळ्यांची काळजी घ्यावी

रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांवर क्रीम आणि आय ड्रॉप्स टाकायला विसरू नका. डोळ्याच्या पृष्ठभागाचा भाग हा सर्वात संवेदनशील भाग आहे. म्हणून त्याची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेवरील काळे डाग घालवण्यासोबतच सुरकुत्या घालवण्यासाठी आय क्रिमचा वापर करणं खूप गरजेचं आहे. यामुळे तुमचा दिवसभराचा थकवा दूर होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com