Men's Grooming Tips : चाळीशीतही यंग आणि फिट राहण्यासाठी पुरुषांनी फॉलो करा 'या' गोष्टी; राहाल नेहमी तरुण

Beauty Tips For Men : फक्त स्त्रियांनीच नव्हे तर पुरुषांनीही स्वत:च्या चेहऱ्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
Men's Grooming Tips
Men's Grooming Tips Dainik Gomantak

Beauty Tips For Men : प्रत्येकजण स्वत:ला स्मार्ट दाखवण्यासाठी प्रयत्न करत असतो. यासाठी लोक विविध प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स आणि ब्युटी टिप्स फॉलो करण्यासाठी मागेपुढे पाहत नाहीत. फक्त स्त्रियांनीच नव्हे तर पुरुषांनीही स्वत:च्या चेहऱ्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. पुरुषांना त्यांच्या त्वचेची विशेष काळजी घेण्यासाठी प्रत्येक लहान गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

पुरुषांची त्वचा रफ असते आणि यामुळेच पुरुषांना दीर्घकाळ तरूण दिसायचे असेल, तर त्यांनी खाली नमूद केलेल्या काही सवयींचा अवलंब करणे गरजेचे आहे. या अशा सवयी आहेत ज्यांचा रोजच्या दिनक्रमात नियमितपणे समावेश करता येतो. एवढेच नाही तर याचे फायदेही काही दिवसांतच पाहायला मिळू शकतात. (Beauty Tips For Men)

Men's Grooming Tips
Reasons & Solutions For White Beard: कमी वयात दाढीचे केस पांढरे होण्याची 4 कारणं आणि त्यावर सोप्पे उपचार

1. दररोज चेहरा स्वच्छ करा

  • वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठीच ब्युटी टिप्सचा अवलंब करणे आवश्यक नाही. त्यापेक्षा तुम्ही या टिप्स कोणत्याही वयात अवलंबू शकता. विशेषतः चेहरा स्वच्छ करण्याची सवय लहानपणापासूनच असायला हवी.

  • चेहरा नियमितपणे स्वच्छ करा. असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावर दिवसभर असलेली घाणही स्वच्छ होईल आणि तुमचा चेहरा स्वच्छ राहील. इतकंच नाही तर चेहरा रोज व्यवस्थित स्वच्छ केल्यामुळे तुम्ही अनेक प्रकारच्या स्किन इन्फेक्शनपासूनही वाचाल. (Men's Grooming Tips)

Men's Grooming Tips
Men's Grooming TipsDainik Gomantak

2. मॉइश्चरायझर वापरा

  • अशी काही मुलं आहेत जी अंघोळीनंतर रोज काहीतरी क्रीम लावावे. खरं तर, हे मुलांच्या चेहऱ्यासाठी असते. यामुळे तुमची स्कीन मऊ राहण्यास मदत होते.

  • वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतर पुरुषांनी नियमित आंघोळीनंतर मॉइश्चरायझर वापरावे. हे त्वचेची छिद्रे उघडण्यास मदत करते, ज्यामुळे चेहऱ्याचे पोषण होण्यास खूप मदत होते.

Men's Grooming Tips
Men's Grooming TipsDainik Gomantak

3. फेस पॅक लावा

  • चेहऱ्यावरील घाण साफ करण्यासाठी फेस पॅकचा वापर केला जातो. याशिवाय, चेहऱ्याची त्वचा सुधारण्यासाठी आणि डाग आणि मुरुम दूर करण्यासाठी देखील हे खूप प्रभावी मानले जाते.

  • तुमच्या घरात असे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही घरगुती फेस पॅक तयार करून चेहऱ्यावर वापरू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्याचा टोन कायम राहील आणि वाढत्या प्रभाव कमी होतो.

Men's Grooming Tips
Men's Grooming TipsDainik Gomantak

4. आठवड्यातून एकदा स्क्रब करा

  • म्हातारपण किंवा उतरत्या वयाचा प्रभाव प्रथम चेहऱ्यावर दिसू लागतो. त्यामुळे चेहऱ्याची विशेष काळजी घेत आठवड्यातून एकदा तरी स्क्रब करणे गरजेचे आहे.

  • तुम्ही हे स्क्रब कोणत्याही घरगुती उपायानेही तयार करू शकता, ज्याचे दुष्परिणाम तुमच्या त्वचेलाही इजा करणार नाहीत. स्क्रबिंगमुळे चेहरा एक्सफोलिएट होण्यास मदत होते आणि तुमची त्वचा चमकदार राहते.

Men's Grooming Tips
Men's Grooming TipsDainik Gomantak

5. केसांनाही थोडा वेळ द्या

  • तरूण दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या शरीराच्या एका भागाकडेच लक्ष दिले पाहिजे असे नाही, तर प्रत्येक लहान-मोठ्या ब्युटी टिप्सकडे लक्ष देणे आवश्यक आहे. केसांची चांगली चमक सर्वांचे लक्ष वेधून घेते. त्यामुळे पुरुषांनी केसांकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे.

  • वाढत्या वयाबरोबरच केसांसाठीच्या टिप्सचा वेळोवेळी वापर करून त्यांना निरोगी ठेवायला हवे. काही घरगुती उपायांद्वारे केस काळे आणि मजबूत करण्यासाठी स्पेशल हेअर मास्क देखील वापरता येतात.

Men's Grooming Tips
Men's Grooming TipsDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com