Beauty Tips: मुलींनो मेकअप करताना या चुका टाळा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 3 एप्रिल 2021

एकदा बिघडलेला मेकअप पुन्हा दुरुस्त करता येत नाही, त्यासाठी पुन्हा नव्याने मेकअप करावा लागतो. त्यामुळे मेअकपमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या चुका कशा सुधाराव्यात यासाठीच्या काही खास टिप्स...

मेकअप करणे, तसे सोपे वाटत असले तरी काही वेळा आपल्याकडून छोट्या चुका होतात आणि त्यामुळे पूर्ण मेकअपचा लूक बदलून जातो. त्यामुळे मेकअप करताना आपल्याकडून कोणत्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. कारण, एकदा बिघडलेला मेकअप पुन्हा दुरुस्त करता येत नाही, त्यासाठी पुन्हा नव्याने मेकअप करावा लागतो. त्यामुळे मेअकपमध्ये होणाऱ्या महत्त्वाच्या चुका कशा सुधाराव्यात यासाठीच्या काही खास टिप्स...

फाउंडेशनची चुकीची शेड निवडणे, ही कॉमन चूक आहे. फाउंडेशन तुमच्या लूकला बनवूही शकते आणि बिघडवूही शकते. फाउंडेशन आधी आपल्या चेहऱ्याच्या कडेला लावून बघा. फाउंडेशन तुमच्या त्वचेमध्ये ब्लेंड होऊन गायब होत असेल, तर ते तुमच्या मेकअप बेससाठी एकदम परफेक्ट आणि चांगलं आहे.

आयशॅडो आणि लिपस्टिक सारख्या रंगांचे असल्यास तेही तुमचा लूक बिघडवू शकतात. डोळ्यांना डार्क शेड्स लावत असाल, तर ओठांना नेहमी लाइट शेड्सच्या लिपस्टिक वापरा. स्मोकी आईज मेकअप करताना लिपस्टिकची शेड न्यूड किंवा पीच ठेवा. ओठांवर कधीही डायरेक्ट लिपस्टिक लावू नका. असे केल्यामुळे तुमचे ओठ ड्राय होतातच; पण फाटूही लागतात.

लिपस्टिक लावण्याआधी ओठांवर नेहमी व्हॅसलीन लावा. लिप लायनरने आपल्या ओठांना शेप द्या आणि मग तुमची आवडती लिपस्टिक शेड लावा. फाउंडेशन कधीही चेहऱ्यावर थेट लावू नये. त्वचा केमिकल्सपासून सुरक्षित राहावी यासाठी चेहऱ्याला आधी मॉइश्‍चरायजर लावून घ्या. त्यानंतर प्रायमर आणि फाउंडेशन लावा.

संबंधित बातम्या