Beauty Tips: सकाळी नियमितपणे 'या' स्किन केअर रूटीन टिप्स फॉलो केल्यास वाढेल ग्लो

लग्न, पार्टी किंवा कोणत्याही समारंभात जाण्यापूर्वी हे स्किन केअर रुटीन फॉलो केल्यास त्वचा चांगली राहते.
skin care tips
skin care tipsDainik Gomantak

Skin Care Tips: सध्या लग्नसराईचा सिझन सुरू आहे. या ठिकाणी जाण्यापूर्वी मुली खूप तयारी करतात. वेगळं आणि स्टायलिश दिसण्यासाठी त्या स्किन केअर रूटीनही फॉलो करतात. काहीजण चमकदार त्वचेसाठी ब्युटी पार्लरमध्येही जातात. अनेक वेळा पार्लरमध्ये गेल्यावरही ती चमक चेहऱ्यावर हवी तशी येत नाही. 

तुम्ही घरच्या घरी तुमचा चेहरा सुंदर करू शकता. ग्लॅमरस दिसण्यासाठी तुम्ही सीटीएमची (CTM) पद्धत वापरु शकता. ही पद्धत आजकाल ट्रेंडमध्ये आहे. लग्नाला जाण्यापूर्वी काही दिवस आधी CTM फॉलो करून तुम्ही स्वतःला सर्वात सुंदर बनवू शकता. लग्नात सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर खिळलेल्या असतील.

  • CTM म्हणजे काय

CTM म्हणजे क्लीनिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करणे होय. दररोज त्वचा स्वच्छ करणे, ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझिंग खूप महत्वाचे आहे. ही डेली रुटिन फॉलो केल्यास आपण स्वत:चा चेहरा चमकदार बनउ शकता.

  • CTM करण्याचा सर्वोत्तम मार्ग

सर्वात पहिले चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावावे लागते. सीटीएम दिनचर्या रात्री अनेकदा पाळली पाहिजे. मग त्याचा फायदाही जास्त होतो. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा (Face) धुवून त्वचा स्वच्छ करा. यानंतर होममेड टोनरने स्किन टोनिंग करा.  तुम्ही सीटीएममध्ये जी काही उत्पादने वापरता, ती तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार खरेदी करा.

  • फायदे

नियमितपणे CTM केल्याने त्वचेवर मृत त्वचा कमी होते. क्लीनिंग केल्याने त्वचा चांगली स्वच्छ होते.

चेहऱ्यावर ग्लो आणि सुंदर त्वचा दिसण्यासाठी दररोज CTM चा दिनक्रम फॉलो करावा.

मॉइश्चरायझर त्वचेला (Skin) हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com