Healthy Tips: 'या' पानांवर जेवण केल्यास अनेक गंभीर आजार राहतात दूर

पानावर जेवण करणे ही केवळ परंपरा नाही तर यामुळे आरोग्यासाठी अनेक फायदे मिळू शकतात.
Benefitis of eating on banana leaves
Benefitis of eating on banana leaves Dainik Gomantak

Eating Food on These Leaves is Healthy Too: भारतातील वेगवेगळ्या राज्यांची स्वतःची परंपरा आहे. यापैकी एक परंपरा म्हणजे पानांवर अन्न खाणे. जरी आता लोक आधुनिक झाले आहेत आणि आता ताटात अन्न खातात. 

पण आजही अशी अनेक राज्ये आहेत जिथे पानांवर अन्न खाल्ले जाते. विशेषतः दक्षिण भारतात पाने वापरली जातात. या परंपरेमागे खूप मोठा आरोग्य लाभ दडलेला आहे. खरं तर, बरेच लोक पानांना पवित्र आणि पूजनीय मानतात आणि त्यांचा खाण्यापिण्यासाठी वापर करतात.

  • कमळाची पाने

कमळाच्या पानांवर जेवण करणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानले जाते. कमळाच्या पानांमुळे हृदयाचे ठोके नियंत्रित राहतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. यावर जेवण केल्याने खाण्याचा फायदा म्हणजे रक्ताभिसरण संतुलित राहते. 

त्यामुळेच आजही अनेक ठिकाणी कमळाच्या पानांचा वापर अन्न ठेवण्यासाठी आणि शिजवण्यासाठी केला जातो. या पानांवर गरमागरम जेवण दिल्यावर त्यातील पोषक घटक अन्नामध्ये मिसळतात आणि त्यामुळे तुम्हाला फायदा होतो.

  • फणसाची पाने

फणसाच्या पानांवर जेवण केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्यावरील जेवण केल्याने त्यामध्ये असलेले कॅन्सरविरोधी घटक शरीरात प्रवेश करतात.

हे कर्करोग विरोधी घटक शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखण्यास मदत करतात. याशिवाय फणसाच्या पानांवर जेवण केल्याने हृदयविकारापासून बचाव होतो.

Benefitis of eating on banana leaves
Rawa Kachori Recipe: 'रवा कचोरी' चा संध्याकाळच्या नाश्त्यात घ्या आस्वाद
  • सागाची पाने

सागाच्या पानांबद्दल फारच कमी लोकांना माहिती असली तरी वडीलजन त्याची पाने खूप फायदेशीर आहे असे म्हणतात. सागाच्या पानांमध्ये भरपूर फायबर असते.

या पानात तुरट गुणधर्म आढळतात आणि हे तुरट गुणधर्म त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे त्वचा चमकदार होते. यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते जे त्वचेला हायड्रेट आणि उजळ करते.

  • केळीची पाने 

केळीच्या पानांवर जेवण करणे खूप फायदेशीर आहे. आजही दक्षिण भारतात केळीच्या पानांवर जेवण देण्याची परंपरा आहे. यामुळे पिंपल्ससारख्या आजारांपासून बचाव होतो.

पोटाशी संबंधित आजार जसे की बद्धकोष्ठता, अपचन, गॅसची समस्या दूर होते. केळीच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडेंट असतात जे या समस्यांपासून तुमचे संरक्षण करतात.

  • पळसाने पाने

पळसाच्या पानांवर जेवण करणे आरोग्यदायी मानले जाते. आजसुद्धा अनेक गावांमध्ये पगंत असल्यास या पानांवर जेवण दिल्या जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com