मासिक पाळीत महिलांनी धावणे किती योग्य, जाणून घ्या

मासिक पाळीत महिलांनी धावपळ करावी की नाही, हा प्रश्न अनेकांच्या मनात असते,आज आम्ही तुम्हाला महिलांनी या दिवसात धावावे की नाही.
मासिक पाळीत महिलांनी धावणे किती योग्य, जाणून घ्या
मासिक पाळीत महिलांनी धावणे किती योग्य, जाणून घ्या Dainik Gomantak

मासिक पाळीत (Menstruation) अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. या काळात चिडचिड होणे, पोट दुखणे, कंबर दुखणे याप्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. आरोग्य तज्ञांच्या मते या काळात महिलांनी सक्रिय (Active) राहायला हवे. पण अनेक महिला या काळात आराम करतात. या काळात महिलांनी सोपे योगा (Yoga) किंवा वर्कआऊट (Workout) करायला पाहिजे. पण अनेक महिलांच्या मनात हा प्रश्न असतो की या काळात धावणे योग्य असते की नाही, चला तर मग जाणून घेवूया.

मासिक काळात धावणे योग्य की अयोग्य

तुम्हाला जर मासिक काळात रनिंग अ‍ॅक्टिव्हिटी करायची असेल, तर तुम्ही ते करू शकता. एक अभ्यासात असेही समोर अळे आहे की मासिक काळात 30 मिनिटे वर्कआऊट करायला पाहिजे , असे केल्याने शारीरिक वेदना कमी होतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची शरीराला हानी होत नाही. जर तुम्हाला या काळात पाठदुखीचा त्रास होत असेल तर धावल्याने किंवा योगा केल्याने वेदना कमी होऊ शकतात. धावल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढते, त्यामुळे शरीराला होणाऱ्या वेदना कमी होतात.

मासिक पाळीत महिलांनी धावणे किती योग्य, जाणून घ्या
ग्लुकोमीटर वापरताना टाळा या 5 सामान्य चुका

* मासिक पाळीत धावण्याचे फायदे

तुम्हाला थोडे हे विचित्र वाटत असेल की मासिक पाळीत धावण्याचे फायदे काय असतील. पण खरच मासिक पाळीत धावल्याने किंवा सोपे योगासने केल्यास शरीरातील एंडोर्फिन हार्मोनची पातळी झपाट्याने वाढते आणि त्यामुळे वेदना दूर होतात.जर नुसते मासिक पाळीच्या काळात वेदनामुळे महिला दिवसभर पडून राहत असतील तर स्नायू अधिक कडक होतात, ज्यामुळे शरीराला अधिक वेदना होतात. पण धावल्याने स्नायू सक्रिय होतात, त्यामुळे तुम्हाला भरपूर आराम मिळतो.

* धावताना घ्या ही काळजी

मासिक पाळीत धावत असाल तर शरीरात पाण्याची कमतरता नसावी. अधिकअधिक फळांच्या ज्यूसचे सेवन करावे. या काळात सकस आहार घ्यावा. यात हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, सुकामेवा या पदार्थांचा समावेश करावा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com