सकाळी सकाळी चांगला मूड हवायं? मग या सवयी टाळाच..

Best habits to feel fresh in the morning
Best habits to feel fresh in the morning

दिवसभर उत्साही आणि सकारात्मक राहण्यासाठी आपण आपली सकाळ चांगली सुरू करणे फार महत्वाचे आहे. सकाळी उठून काही चांगल्या सवयी अंगिकारल्या आणि आपल्या जीवनशैलीतून नकळत होणाऱ्या चुका दूर केल्या, तरच हे शक्य आहे. आपल्या जीवनशैलीत होणारे हे छोटे बदल आपल्याला निरोगी आणि मानसिकदृष्ट्या दिवसभर सकारात्मक ठेवू शकतात.

अंथरुणावरुन धक्क्याने उठणे

बर्‍याच जणांची सवय आहे की गजर वाजताच ते धपकन् उठतात आणि शॉक घेऊन बसतात आणि मग कामला जाण्यासाठी धावधाव सुरू करतात. हे अजिबात करू नये. जेव्हा जेव्हा तुम्ही झोपेत असता, तेव्हा शरीर आणि स्नायू कामासाठी तयार नसतात. यासाठी उठल्यावर सगळ्यात आधी पलंगावर उठून बसा, दीर्घ श्वास घ्या, दोन मिनिटे बसून उभे रहा आणि एक ग्लास पाणी प्या आणि मगच खोलीतून बाहेर पडा. असे केल्याने, आपले मन आणि शरीर दोन्ही कामासाठी तयार होईल.

गजर वारंवार स्नूझ करणे

ही उठण्याची अत्यंत लोकप्रिय पद्धत आहे. लोक सकाळसाठी गजर लावतात, परंतु तो बंद करून पुन्हा झोपी जातात.एकदा झोप मोडल्यावर परत झोपल्यामुळे मानसिकरित्या आराम मिळत नाही, त्यामुळे ही चूक करू नका. जर आपण आपल्या झोपेस वारंवार त्रास देत असाल, तर ते आपल्या मानसिक आरोग्यास हानी पोहचवते, म्हणूनच जेव्हा आपण खरोखर उठू इच्छित असाल, तेव्हाच उठा आणि विनाकाऱण गजर लावून आपली झोपमोड करून घेऊ नका.
 

डोळे उघडताच मोबाईल चेक करणे

जर तुम्हीही मोबाईल आणि सोशल मीडियाने दिवसाची सुरूवात करत असाल, तर ही सवय तुमच्या शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली नाही.आजच्या दिवसाच्या नियोजनासह नवीन दिवस सुरू करण्याचा प्रयत्न करा. दिवसभरातील कामासाठी ते तुम्हाला मानसिकरित्या तयार करते.

दिवसाची सुरुवात बेड टी ने करणे

जर आपण सकाळी रिकाम्या पोटी चहा आणि कॉफी पिऊन सुरुवात केली, तर ते आपल्या चयापचयसाठी चांगले नाही. हे आपल्या आरोग्यास प्रत्येक बाबतीत इजा करते. त्याऐवजी कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्या. आपण सकाळी ग्रीन टी देखील घेऊ शकता. न्याहारीनंतरच चहा किंवा कॉफी प्या.

न्याहारी न करणे

जगभरातील बर्‍याच संशोधनात असे समोर आले आहे की जर आपण सकाळी न्याहारी करत नसाल, तर ते बर्‍याच रोगांना आमंत्रण देते. उदाहरणार्थ, लठ्ठपणा, मधुमेह आणि कमी प्रतिकारशक्ती. म्हणून जर सकाळी न्याहारी न करण्याची सवय असेल, तर ही सवय सोडून द्या. 

स्ट्रेचिंग महत्वाचे आहे

रात्रीच्या विश्रांतीनंतर आपले शरीर कामात सक्रिय करण्यासाठी सकाळी लाईट स्ट्रेचिंग आवश्यक आहे. आपण हा हलका व्यायाम बेडवर देखील करू शकता. नित्यक्रमानंतर ताज्या मूडमध्ये आपण आपल्या शरीराच्या प्रत्येक भागास मोकळ्या हवेत स्ट्रेच करून, खोल श्वास घेणे हा दिवस सुरू करण्यासाठी उत्तम व्यायाम आहे. असे केल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश वाटेल. याचबरोबर आपण ध्यान करून देखील दिवसाची सुरू वात करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com