Trains In India: अविस्मरणीय प्रवास अनुभव देणाऱ्या 'या' 5 ट्रेनने एकदा फिराच

Best Trains: जगातील या सर्वात सुंदर आणि एकदम लग्जरियस ट्रेन भारतामध्ये आहेत.
Train
TrainDainik Gomantak

Best Trains: पर्यटनाच्यादृष्टीने भारत जगामध्ये समृद्धशाली देश म्हणून ओळखला जातो. प्राचीन मंदिरं, लेण्या, बर्फाळ प्रदेश, टेकड्या अशी अनेक प्रेक्षणीय स्ठळे भारतामध्ये आहेत. हा समृद्ध ठेवा पाहण्यासाठी लाखो पर्यटक जातात. यामध्ये भारतीय रेल्वेचा फार मोठा वाटा आहे. चला तर मग सुंदर प्रवास घडवणाऱ्या आलीशान ट्रेनविषयी जाणून घेऊयात.

  • महाराजा एक्सप्रेस

महाराजा एक्सप्रेस ही जगातील सर्वात सुंदर ट्रेनपैकी एक आहे. या ट्रेनला 2010 ला सुरुवात झाली. अनेक सुंदर स्थळांवरुन ही ट्रेन पुढे जाते. या ट्रेनमध्ये पाहुणचारासाठी सुंदर बार, बैठकीची भव्य दालने, खास जेवणाची व्यवस्था अशा सुविधा आहेत. जगातील लक्झरी ट्रेनच्या यादीमध्ये महाराजा ट्रेनचे नाव घेतले जाते. मुंबईपासुन उदयपुर, जोधपुर, बीकानेर, जयपुर, रणथंबोर, आग्राआणि दिल्ली असा या एक्सप्रेसचा रुट आहे.

Train
TrainDainik Gomantak
  • पॅलेस ऑफ व्हील्स

महाराजा एक्सप्रेसनंतर पॅलेस ऑफ व्हील्सचा नंबर लागतो. ही ट्रेन राजस्थान यात्रेसाठी उत्तम पर्याय आहे. या ट्रेनमध्ये शानदार केबीन, भारतीय चित्रकला दर्शवणारे वॉलपेंटींग, सुसज्ज महाल, कलात्मक दालनं या गोष्टी पर्यटकांना आकर्षित करतात. दिल्ली, जयपुर, सवाई माधवपुर, चित्तोडगड, उदयपुर, जैसलमेर, जोधपुर, भरतपुर, आग्रा असा या ट्रेनचा मार्ग आहे.

  • द डेक्कन ओडीसी

ही एक्सप्रेस 5 स्टार हॉटेलसारखी आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांना रॉयल ट्रिटमेंट दिली जाते. चविष्ट पदार्थ, इंटेरियर कॉन्फ्रेस कार, ऑनबोर्ड स्पा या सुविधा ट्रेनमध्ये (Train) आहेत. मुंबईपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, बेलगाम, कोल्हापुर, पुणे, नासिक, औरंगाबाद, अजिंठा, वेरुळ हा या एक्सप्रेसचा मार्ग आहे.

Train
World AIDS Day 2022: 'जागतिक एड्स दिन' दरवर्षी का केला जातो साजरा? वाचा महत्त्व अन् इतिहास
  • स्वर्ण रथ

ही भारतातील (India) आलीशान ट्रेनपैकी एक आहे. या ट्रेनचा खास पाहुणचार फार फेमस आहे. 2008 मध्ये स्वर्ण रथ ट्रेन सुरु झाली. बॅंगलोर, काबिनी, म्हैसूर, हसन, हंपी, बादामी, गोवा, बॅंगलोर असा या ट्रेनचा रुट आहे.

  • रॉयल ओरिएंट ट्रेन

ही एकदम लग्जरियस ट्रेन आहे. यामध्ये अनेक आरामदायी सुविधा आहे. दिल्ली चितोडगढ, उदयपुर, जुनागढ़, वेरावल, सासन गिर, भीलवाड़ा, पालिताना, सरखेज, अहमदाबाद, जयपुर असा या ट्रेनचा रुट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com