Shopping Tips: शॉपिंगचा विचार करताय, तर साऊथ गोव्याला नक्की भेट द्या

तुम्ही जर साऊथ गोव्याला गेला तर या ठिकाणी खरेदी करण्यासाठी नक्की भेट द्या.
Best places for shopping in South Goa
Best places for shopping in South GoaDainik Gomantak

गोवा (Goa) हे भारतातील सर्वात लहान राज्य म्हणून ओळखले जाते, परंतु प्रत्यक्षात ते एक अतिशय सुंदर राज्य आहे. गोवा जगभरातील पर्यटकांच्या (Tourist) आकर्षणाचे केंद्र बनले आहे. साऊथ गोवा (South Goa) देशातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे असे मानले जाते. सुंदर समुद्रकिनाऱ्यापासून ते रेस्टॉरंट्स आणि रिसॉर्ट्सपर्यंत सर्व काही मानमोहणारे आहे. साऊथ गोव्याला गेल्यावर शॉपिंग करायला मात्र विसरू नका.साऊथ गोव्याला अतिशय वाजवी दरात तुम्हाला उत्तमरित्या शॉपिंगचा आनंद घेता येईल.पण आज आम्ही तुम्हाला साऊथ गोव्यामधील शॉपिंग करण्यासाठी काही चागल्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.

* पालोलेम बीच मार्केट

गोव्यात पर्यटकांना समुद्रकिनारी असलेल्या मार्केटमध्ये काहरेडि करायला अधिक आवडते. त्याचबरोबर पोलोलेम बीचच्या मार्केटमध्ये एक वेगळीच हिप्पी संस्कृती पाहायला मिळते. येथे प्रत्येक शनिवारी एक विशेष बाजार भरतो आणि गरजेच्या अनेक वस्तु अतिशय स्वस्त दरात खरेदी करता येतात. जर तुम्हाला खरेदी करतांना भाव करता येत असेल तर तुम्हाला खूप किमतीमध्ये वस्तु मिळतील.

* कोळवा बीच मार्केट

गोव्यात जर तुम्हाला खरेदी करण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही कोळवा बीचला नक्की भेट द्या. या मार्केटमध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तिसाठी उत्तम भेटवस्तु खरेदी करू शकता. या मार्केटमध्ये तुम्ही जर खरेदी करतांना भाव केले तर तुम्हाला कमी किमतीमध्ये उत्तम वस्तु खरेदी करता येईल. रात्रीच्या वेळी हे मार्केट लख्ख दिव्यांनी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत.

Best places for shopping in South Goa
Culture of Goa: गोव्याच्या संस्कृतीबद्दल जाणून घेऊया

* गांधी मार्केट

गांधी मार्केट हे गोव्यातील सर्वोत्तम आहे. पूर्वी गांधी मार्केट केवळ ताजी फळे आणि भाज्याच्या खरेदीसाठी प्रसिद्ध होते. मात्र नंतर या मार्केटला वेगळेच स्वरूप मिळाले. आता फळे, भाजीपाला व्यतिरिक्त आता तुम्हाला येथे स्वस्त कपडे, हँडबॅग आणि शूज यासारख्या अनेक वस्तु खरेदी करता येईल.

* मडगाव म्युनिसिपल मार्केट

तुम्हाला जर साऊथ गोव्यामध्ये स्ट्रीट शॉपिंग करायची असेल तर मडगाव मार्केटला नक्की भेट द्या. या मार्केटमध्ये तुम्हाला आर्टक्राफ्टपासून ते हस्तकलेपर्यंतच्या अनेक वस्तु खरेदी करू शकता. तसेच काजू, मसाले, कपडे, शूज आणि फर्निचर यासरख्या अनेक वस्तु वाजवी दरात खरेदी करता येतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com