Travel Dishes: तुम्ही 'या' चटपटीत पदार्थांचा प्रवासात घेऊ शकता आस्वाद

प्रवास करतांना कोणते पदार्थ सोवत असावे दे जाणून घ्यावे.
Travel Dishes| Travel Tips
Travel Dishes| Travel TipsDainik Gomantak

सर्वांना विविध ठिकामी प्रवास करायला आवडते. कारण हीच वेळ आहे जेव्हा आपण आपल्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ स्वतःसाठी काढू शकतो आणि आयुष्याचा आनंद घेऊ शकता. ज्याप्रमाणे प्रवासापूर्वी आपण विचार करतो की आपण काय पॅक करावे किंवा कोणत्या गोष्टी सोबत घ्याव्यात, जेणेकरून प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये. त्याचप्रमाणे प्रवास करतांना कोणकोणते पदार्थ खायला ठेवाव्यात जेणेकरून तुमचे आरोग्य बिघडू नये आणि ते दीर्घकाळ ताजे राहतील. आम्ही तुमच्यासाठी प्रवासातील खाद्यपदार्थांची यादी आणली आहे जी तुम्ही जरूर पहा.

लेमन मिंट ज्युस

प्रवासादरम्यान पाणी जवळ ठेवणे आवश्यक आहे. परंतु जर तुम्हाला कोणतेही फ्रेश ज्युस घ्यायचे असेल तर तुम्ही लेमन मिंट ज्युस बनवू शकता. हे तयार करण्यासाठी पुदिन्याची पाने क्रश करून घ्या आणि पाण्यात लिंबाचा रस, थोडे मीठ आणि साखर मिक्स करा.

बडीशेप

प्रवासात अनेक वेळा तोंडाची टेस्ट बिघडते. यासाठी बडीशेप, लवंग आणि वेलची सोबत ठेवावी. यामुळे तोंडाची चव चांगली राहील.

Travel Dishes| Travel Tips
Hair Care Tips| केसांना चमकदार बनवण्यासाठी कोलेस्ट्रॉल हेअर ट्रीटमेंट ठरते फायदेशीर

स्नॅक्स

प्रवासात असे खाद्यपदार्थ ठेवावे कि जे खराव होणार नाही. चिवडा, पॅकिंगचे पदार्थ सोबत ठेवावे.

व्हेज सँडविच

सँडविच हा पदार्थ ट्रॅव्हल फेंडली आहे. तसेच हा पदार्थ बनवणे सोपे आहे. बनवण्यासाठी तुमच्या आवडीच्या भाज्या कापून नंतर ब्रेडवर मेयोनेझ लावा. त्यावर टोमॅटो सॉस टाका आणि नंतर भाजी मधोमध ठेवून झाकण ठेवून बेक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com