Black Pepper: वाढत्या संसर्गजन्य आजारांवर काळी मिरी उपयोगी

Black Pepper: काळ्या मिरीमध्ये पेपरिन नावाचा घटक असतो.
Black Pepper
Black PepperDainik Gomantak

Black Pepper: भारतीयांच्या अन्नपदार्थात मसाल्यांचे महत्व अनादी काळापासून असल्याचे दिसून येते. मसाल्यामध्ये काळ्या मिरीला प्रचंड महत्वाचे स्थान आहे. गोव्यात काळ्या मिरीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मानवाच्या आरोग्यासाठी या काळ्या मिरीचे काय फायदे आहेत हे जाणून घेऊयात.

काळी  मिरी केवळ तुमच्या खाद्य  पदार्थांना एक  विशिष्ट चव  देत  नाही तर शरीर आणि मनाला अद्भुत  फायदे देखील देते.

काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. बर्‍याच रोगांमध्येही हे प्रभावी औषध म्हणून वापर केला जातो. काळ्या मिरीमध्ये पेपरिन नावाचा घटक असतो. हा घटक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे.

याबरोबरच लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, जस्त, क्रोमियम, व्हिटामिन ए आणि इतर पोषक गुणधर्म आढळतात.

याशिवाय यामध्ये रायबोफ्लेविन, थायामिन, पोटॅशियम, सोडियम, फॉलेट, बेटेन आणि नियासिन हे घटकदेखील आढळतात. या कारणांमुळे चवीबरोबरच काळी मिरी आपल्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे.

Black Pepper
Vitamin C Benefits : उन्हाळ्यात नितळ त्वचेसाठी विटामीन सी अतिशय फायदेशीर; वाचा सविस्तर

त्याच्या अद्भुत अँटिऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरीमुळे संधिवात, मधुमेह, कर्करोगापासून ते अल्झायमरसारख्या जुन्या आजारांपासून दूर ठेवण्याचे महत्वाचे कार्य करतो.

पेपरिन हे मेंदूच्या कार्यामध्ये मदत करतात, पोषक तत्वांचे शोषण वाढवतात आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कार्यक्षमता सुधारतात. काळी मिरी पोषक तत्वांचे शोषण सुधारते. महत्वाचे म्हणजे काळी मिरी वजन कमी करण्यातदेखील मदत करते.

आता वाढत असलेल्या संसर्गजन्य आजारांवर म्हणजेच खोकला आणि सर्दी कमी करण्यासाठी काळी मिरी उपयोगी पडते. त्याचबरोबर, शरीरावरील सूज कमी करण्यासाठी आणि पचनकार्य सुधारण्यासदेखील मदत करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com