Astro Tips: काळ्या धाग्यात अशी कोणती शक्ती? जी तुम्हाला सुरक्षित ठेवते

Astro Tips: आपल्या समाजामध्ये काळा धागा बांधणं शुभ मानलं जातं.
Black Thread
Black ThreadDainik Gomantak

Astro Tips:अनेक लोकं आपल्या हातामध्ये, गळ्यात, पायामध्ये काळा धागा बांधत असतात. आपल्या समाजामध्ये काळा धागा बांधणं शुभ मानलं जातं. अनेक वर्षांपासून लोक ही प्रथा मानत आले आहेत. पण नेमकं ही प्रथा का आहे? ही प्रथा सुरु केव्हा झाली? लोकांमध्ये काळा धागा बांधण्याविषयी काय समज आहेत? याविषयी काही इंट्रेस्टींग गोष्टी जाणून घेणार आहोत.

Black Thread
Black ThreadDainik Gomantak

ज्योतिषाशास्रात काळा रंग हा शनि ग्रहाचा रंग मानला जातो. शनि ग्रह कर्माप्रमाणे फळ देणारा ग्रह मानला जातो. जे लोक चांगले कर्म करतात. त्यांना चांगले फळ मिळते. तर जे लोक वाईट कर्म करतात, त्यांना वाईट परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे शनिच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी लोक काळा धागा बांधतात.

Black Thread
Black ThreadDainik Gomantak
Black Thread
Water Intake According Weight: तुमच्या वजनानुसार, दररोज किती पाणी प्यावे? जाणून घ्या

काळा धागा गळ्यात बांधल्यावर शनिची वाईट दृष्टी पडत नाही, असा समज लोकांमध्ये आहे. ज्योतिषशास्रात (Astrology) पण तेच म्हणले आहे. काळा धागा वाईट नजरेपासून रक्षा करतो,असे मानले जाते. विशेष करुन मुली पायामध्ये काळा धागा बांधतात. तर बहुतेक मुलांच्या हातात काळा धागा बांधलेला पहायला मिळतो.

Black Thread
Black ThreadDainik Gomantak

तसेच, काळा धागा हा नेगिटीव्ह (Negative) एनर्जी नाहीशी करतो. तसेच, तुमची पॉजिटीव्ह एनर्जी वाढते. तुमचा गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. मोठी सकारात्मक ऊर्जा तुमच्यात निर्माण होते. त्यामुळे नेगिटीव्हीटीपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी लोकं काळा धागा बांधतात. काळा धागा हा फार शुभ मानला जातो. पण काही व्यक्ती फॅशन म्हणून पण काळा धागा बांधताना आजकाल दिसतात. काळा धागा वापरुन छान पायात बांधण्यासाठी सुंदर स्टाईलिश अ‍ॅंकलेट बाजारात विक्रीसाठी आलेले पहायला मिळतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com