स्त्री-पुरुषामधील नातेसंबंध सांगणारा ‘लीडर’ शर्यतीत

बोजनोस्कीनिर्मित ‘लीडर’ पहिलाच चित्रपट आहे.
स्त्री-पुरुषामधील नातेसंबंध सांगणारा ‘लीडर’ शर्यतीत
स्त्री-पुरुषामधील नातेसंबंध सांगणारा ‘लीडर’ शर्यतीतDainik Gomantak

पणजी:आधुनिक काळ स्त्री आणि पुरुष यांच्यातील नातेसंबंध सर्वसाधारणपणे कसे बदलू शकतो हे दाखविण्याचा प्रयत्न ‘लीडर’ (Leader) हा चित्रपटातून करण्‍यात आला आहे. यात मुख्यत्वे केवळ पुरुषांच्या दृष्टिकोनातून स्त्रियांचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे चित्रपटाचे निर्माते कोरेक बोजनोस्की यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

स्त्री-पुरुषामधील नातेसंबंध सांगणारा ‘लीडर’ शर्यतीत
धनगरी फुगडीचे धडे गुरू-शिष्य परंपरेचा आविष्कार..

लबाडीवर प्रकाश

‘लीडर’ (Leader) हा पोलिश चित्रपट आहे. बोजनोस्कीनिर्मित हा पहिलाच चित्रपट आहे. जेगोश हार्टफिल या सिनेमॅटोग्राफर आहेत. ब्लॅक कॉमेडीच्या शैलीतील या गतिमान चित्रपटाच्या कल्पनेवर प्रकाश टाकताना बोजनोस्की म्‍हणाले की, लोक लबाडीने जगात स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी इतरांचा वापर कसा करतात हे चित्रित करण्याचा प्रयत्न हा चित्रपट करतो. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर इफ्फीत झाला. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या प्रतिष्ठेच्या ‘सुवर्णमयूर'' पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा श्रेणीमध्ये इतर 14 चित्रपटांसह या चित्रपटाचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com