Brain Health: जंक फूडसह या 4 पदार्थांमुळे होऊ शकते Memory Loss

सकस आहारच्या अभावामुळे आपली स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते.
Brain Health: जंक फूडसह या 3 पदार्थांमुळे होऊ शकते Memory Loss
Brain Health: जंक फूडसह या 3 पदार्थांमुळे होऊ शकते Memory LossDainik Gomantak

अनेक लोकांची स्मरणशक्ती (Memory) दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. कधी वाचलेले आठवत नाही तर कधी कोणती वस्तु कोठे ठेवली हे आठवत नाही. यात दोष वयाचा नसून जंक फूडसारख्या (Junk food) पदार्थांचा आहे. यामुळे स्मरणशक्ती (Memory) चांगली राहण्यासाठी जंकफूड सारखे पदार्थ (Food) खाणे टाळावे. आपली स्मरणशक्ती ही आपल्या आहारावर अवलंबून असते. यामुळे पुढील पदार्थांचे सेवन करणे टाळावे. अन्यथा आपली स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते.

* पुढील पदार्थ खाणे टाळावे

* नूडल्स

अनेक लोकांना झटपट तयार होणारे पदार्थ आवडतात. पाच मिनिटांमध्ये तयार होणारे नूडल्स चवदार लागतात. नूडल्सने पोट देखील लवकर भरते. पण यामुळे आपल्या आरोग्यला धोका निर्माण होऊ शकते. नूडल्सचे अतिसेवण केल्याने आपली स्मरणशक्ती कमी होऊ शकते.

Dainik Gomantak

* मद्यपान

आपल्या माहिती आहे की मद्यपान करणे आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकते. मद्यपान केल्याने शरीरातील व्हिटॅमिन बी चे प्रमाण कमी होऊन मेंदूची स्मरणशक्ती कमी होऊ शकते. तसेच मद्याचे अतिसेवण केल्याने अनेक आजार होऊ शकतात. मद्यपान कमी केल्याने स्मरणसक्ती चांगली राहते.

Brain Health: जंक फूडसह या 3 पदार्थांमुळे होऊ शकते Memory Loss
Healthy Food: शाकाहारी लोकांना लाभते दीर्घायुष्य?

* जंक फूड

तुम्हाला जर स्मरणशक्ती वाढवायची असेल तर जंक फूड खाणे टाळावे. एका संशोधनात असे आढळले की या पदार्थांमध्ये सोड्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे या पदार्थांचे अतिसेवण केल्याने स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते. यामुळे पीज्जा, बर्गरसारख्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

Dainik Gomantak

* पॅकिंग फूड

अनेकांना पॅकिंग फूड खायला आवडते. परंतु पॅकिंग फूड आणि सॉफ्ट ड्रिंक्स या पदार्थांचे अतिसेवण केल्यास स्मरणशक्ती कमकुवत होऊ शकते. पॅकिंग फूडमध्ये असलेले उच्च फ्रक्टोज कॉर्न सीरप हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे मेंदूची स्मरणशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com