Buddha Purnima 2021: भगवान बुद्धाची खास शिकवण

Buddha Purnima 2021: भगवान बुद्धाची खास शिकवण
Buddha Purnima

Buddha Purnima 2021: आज 26 मे 2021 रोजी बुद्ध जयंती आहे. दरवर्षी वैशाख मासातील पौर्णिमा बुद्ध जयंती म्हणून साजरी केली जाते, या सणाला बुद्ध पौर्णिमा म्हणतात. हा दिवस बौद्ध धर्माच्या लोकांसाठी आणि सनातन धर्मात श्रद्धा असणाऱ्यांसाठीही खास आहे. असे मानले जाते की भगवान बुद्ध हा श्री हरि विष्णूचा 9 वा अवतार होते. त्यांचा निर्वाण दिन बुद्ध जयंतीच्या दिवशीही साजरा केला जातो. बौद्ध धर्मावर श्रद्धा असणाऱ्यांसाठी बुद्ध पौर्णिमेचा दिवस खूप खास आहे. बौद्ध अनुयायांसाठी हा सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवशी अनेक समारंभांचे आयोजन केले जाते. बौद्ध धर्माचे अनुसरण करणाऱ्या बर्‍याच देशांमध्ये तेथील प्रथा आणि संस्कृतीनुसार समारंभ आयोजित करतात. आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त आपण भगवान बुद्धांच्या काही प्रमुख शिकवणींबद्दल शिकूया, ज्यामुळे आपण आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल करू.(Buddha Purnima 2021 Special teachings of Lord Buddha)

भगवान बुद्धाची खास शिकवण

वर्तमानात जगा
भगवान बुद्धांनी आपल्या प्रवचनात सांगितलेल्या मुख्य गोष्टींपैकी एक म्हणजे माणसाणे त्याच्या भूतकाळात कधीही अडकवू नये किंवा भविष्याचेही स्वप्न पाहू नये. माणसाने आपल्या सद्यस्थितीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि वर्तमानात जगले पाहिजे.

रागामुळे फक्त त्रास होतो
भगवान बुद्ध यांनी आपल्या प्रवचनांमध्ये असे सांगितले आहे की, कोणीही आपल्या रागाने कुणालाही इजा करू नये, मनुष्याने स्वतःहून. रागावणे म्हणजे आपल्या हातातला जळणारा कोळसा दुसऱ्या कुणावरतरी फेकण्यासारखे आहे ज्यामुळे आधी तुम्हालाच इजा होइल.

स्वत: वर विजय मिळवणे गरजेच
बुद्ध म्हणतात की, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कोणत्याही युद्धात विजय मिळण्यापूर्वी मनुष्याने स्वत: वर विजय मिळवावा. जोपर्यंत मनुष्य हे करत नाही तोपर्यंत सर्व विजय व्यर्थ मानले जातील.

सुखद संघर्षाचा मुलमंत्र
महात्मा बुद्धांनी आपल्या प्रवचनात असे म्हटले आहे की, कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी प्रवास करणे खूप महत्वाचे आहे. माणूस आपले ध्येय साध्य करू शकतो किंवा नाही, परंतु ध्येय गाठण्यासाठीचा प्रवास चांगला असावा. त्याचा अनुभव आयुष्यभर आपल्या बरोबर असतो.

वाटल्याने आनंद वाढतो
भगवान बुद्ध म्हणतात की आनंद हा प्रकाशासारखा असतो, तो अधिकाधिक वाढत जाईल. जळणारा दिवा एक हजार दिवे लावू शकतो, परंतु यामुळे त्याच्या प्रकाशावर परिणाम होणार नाही, त्याचप्रमाणे वाटल्याने आनंद वाढतो.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com