Car Sheet Cover Tips: कारमध्ये लेदर शीट कव्हर लावताय? मग जाणून घ्या फायदे अन् तोटे

Car Sheet Cover Tips: तुम्हीही कारमध्ये लेदर शीट कव्हप लावण्याचा विचार करत असाल तर थांबा, आदी ही बातमी वाचा.
Car Sheet Cover Tips
Car Sheet Cover TipsDainik Gomantak

Car Sheet Cover Tips: कारची काळजी घेणे जेवढे गरजेचे आहे तसेच त्याच्या सीट कव्हरची देखील काळजी घेणे गरजेचे आहे.सीट कव्हर चांगली असले तर तुम्ही प्रवासाचा अधिक चांगला आनंद घेऊ शकता. कारच्या सीट कव्हरमध्ये अनेक प्रकार आहेत.

कारच्या इंटिरिअरला नवा लुक द्यायचा असेल तर कारची शीट कव्हरवर लक्ष द्यायला हवे. कार सीट कव्हरचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये जसे लेदर, मखमली, कापडी शीट कव्हरचा समावेश होतो.

लेदर शीट कव्हर्स लक्झरी फील देतात तर मखमली शीट कव्हर्स आरामदायक असतात. जर तुम्ही लेदर शीट कव्हर लावण्याचा विचार करत असाल तर त्याचे काही तोटे देखील जाणून घ्या.

  • आरामदायी

लेदर शीट कव्हर्स नेहमी इतर प्रकारच्या शीट कव्हर्सइतके आरामदायक नसतात. ही शीट कव्हर घेताना क्वॉलीटी तपासावी. अन्यथा तुम्हाला दुरचा प्रवास करतांना त्रास होऊ शकतो.

  • जास्त गरम होते

लेदर शीट कव्हर उन्हाळ्यात खूप लवकर गरम होऊ शकतात. ज्यामुळे तुम्हाला कारमध्ये जास्त गरमी होऊ शकते. ही शीट कव्हर जास्त उष्णता शोषून घेते. यामुळे तुम्हाला जास्त घाम देखील येऊ शकतो.

Car Sheet Cover Tips
Car Mileage Tips: जुनी कार खूपच इंधन खातेय? 'या' सोप्या टिप्सने वाढवता येईल मायलेज
  • खर्चीक

लेदर शीट कव्हर्स सामान्यतः इतर शीट कव्हर्सपेक्षा जास्त महाग असते. लेदरची शीट कव्हर लावण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकते.

जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला असा सीट कलर हवा असेल ज्याचे मेंटेनन्समध्ये जास्त खर्च येत नसेल, तर लेदर सीट कव्हर लावु नका.

  • जास्त काळजी घ्यावी लागते

लेदर शीट कव्हर स्वच्छ ठेवणे अधिक अवघड जाते. ही शीट कव्हर सारखी स्वच्छ ठेवावी लागेत.लेदर शीट कव्हरला ड्रायक्लिन न केल्यास खुप घाण दिसतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com