Cashews चे त्वचेपासून ते डोळ्यापर्यंतचे जबरदस्त फायदे

काजू खाल्ल्याने पांढऱ्या केसांपासून सुटका होते.
Cashews चे त्वचेपासून ते डोळ्यापर्यंतचे जबरदस्त फायदे
CashewsDainik Gomantak

काजूमध्ये खनिजे, जीवनसत्वे आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. काजू त्वचा, केस आणि आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे आहे. तसेच यात जस्त आणि लोह भरपुर प्रमाणात असते.

काजूमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असते. यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच डोळ्यांचे अतिनील किरणांपासून रक्षण होते.

काजुमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स घटकामुळे त्वचा चांगली राहते. त्वचेवरील डेड स्कीन कमी होण्यास मदत करते. नियमित काजू खाल्ल्याने फ्री रेडीकल्सशी लढण्यास मदत मिळते.

त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी काजू लाभदायी ठरते. कारण यातील झिंक, मॅग्नेशियम, सोलॅनियम, लोह आणि फॉस्फरससह प्रथिने आणि व्हिटॅमिन सी त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते.

लांब आणि चमकदार केस हवे असतील तर काजूचे सेवन करणे गरजेचे आहे. काजूमध्ये असलेल्या कॉपर घटकामुळे केसांची वाढ होते आणि पांढऱ्या केसांपासून सुटका मिळते.

काजूमध्ये पोटॅशियम आणि अनेक पोषक घटक असतात. यामुळे केसांच्या मुळा मजबूत होतात. यामुळे केसांचे गळणे थांबते आणि केसांचे आरोग्य चांगले राहते.

काजूचे अतिसेवन केल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्हाला सुकामेवा खाल्ल्याने अॅलर्जी होत असेल तर आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com