छोटीशी लवंग पुरुषांसाठी या प्रकारे ठरू शकते फायदेशीर

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 मार्च 2021

अनेक देशी औषधांमध्ये आणि डिशेसचा स्वाद वाढविण्यासाठी लवंगाचा वापर केला जातो. विशेषज्ञ या छोट्या लवंगीचे शेकडो फायदे सांगतात. विशेषत: पुरुषांसाठी लवंग खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते.

अनेक देशी औषधांमध्ये आणि डिशेसचा स्वाद वाढविण्यासाठी लवंगाचा वापर केला जातो. विशेषज्ञ या छोट्या लवंगीचे शेकडो फायदे सांगतात. असे म्हणतात की, लवंगमध्ये अँटिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असते. म्हणून हे एका रोगांवर नाही तर अनेक रोगांवर प्रभावी आहे. विशेषत: पुरुषांसाठी लवंग खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते.

या घटकांनी परीपूर्ण

लवंगमध्ये अँटीऑक्सिडंट्स व्यतिरिक्त व्हिटॅमिन के, झिंक, तांबे, मॅंगॅनियम देखील आढळतात. शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लवंग खूप प्रभावी असल्याचे सिद्ध होते. लवंगामध्ये असणारे अँटीऑक्सिडेंट्स शरीराच्या पांढर्‍या रक्त पेशी वाढविण्यासाठी उपयोगाचे असते. जे बर्‍याच रोगांशी लढण्यासाठी उपयुक्त ठरतात. 

मुरूम कमी करण्यास मदत

लवंगमध्ये शरीर साफ करण्याचे तत्व असते. त्याच बरोबर शरीरातील रक्त साफ करणारे घटकही लवंगमध्ये आढळतात. याशिवाय लवंग तेलामध्ये अँटी-मॅक्रोबियल गुणधर्मसुध्दा आहेत. जे चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यास मदत करते. म्हणून लवंग भरपूर प्रमाणात प्रभावी ठरते. 

दातदुखी दुर करते

लवंग दातचं दुखण कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी मानली जाते. बहुतेक टूथपेस्टमध्ये लवंग हा एक महत्वाचा घटक असतो. म्हणून असे म्हणतात की जर तुम्हाला दात दुखत असेल तर लवंग तेलामध्ये कॉटन फॉईल भिजवून दातखाली दाबून ठेवल्यास दुखणं कमी होते. याचा आपल्याला फायदा होईल, कारण लवंगामध्ये असलेल्या संवेदी गुणधर्म काही काळ अस्वस्थता रोखून ठेवते.  

रिकाम्या पोटी लवंग खाल्यास 

पुरुषांबद्दल असे म्हणतात की जर पुरुषांनी सकाळी उठून रिकाम्या पोटी दोन लवंग खाली तर ते पुरुषांसाठी खूप फायदेशीर असते. सकाळी रीकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने पुरुषांचे लैंगिक जीवन सुधारते. पुरुषांची शक्ती वाढविण्यासाठी इतरही अनेक प्रकारे लवंगाचा वापर केला जातो. 

संबंधित बातम्या