लहान मुलांना ही 5 सोशल स्किल शिकवली पाहिजेत

जर तुम्हाला मुलांशी मजबूत नातेसंबंध तयार करायचे असेल तर लहान वयातच मुलांना सामाजिक कौशल्य शिकवणे आवश्यक आहे.
लहान मुलांना ही 5 सोशल स्किल शिकवली पाहिजेत
लहान मुलांना ही 5 सोशल स्किल शिकवली पाहिजेतDainik Gomantak

लहानपणी मुलांना अनेक गोष्टी शिकवल्या जातात. मग ते अन्न स्वत: खाण्याचा विषय असो किंवा त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल पटवून देण्याचा विषय असो. मुलांना एकदा शिकवले की मग त्यात बदल घडवणे अवघड असते. कारण मुलांना आधी शिकवलेले बरोबर आहे की नंतर शिकवले जाते ते बरोबर आहे हे समजायला मुळे तयार नसतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला मुलांशी मजबूत नातेसंबंध तयार करायचे असेल तर लहान वयातच मुलांना सामाजिक कौशल्य शिकवणे आवश्यक आहे.

* शेअर करणे

शेरिंग इज केअरिंग म्हणजेच शेअर करणे काळजी करण्यासारखे आहे, हे लहानपणापासून मुलांना शिकवले पाहिजे. तुमच्या मुलांना शेरिंगचे महत्व शिकवले पाहिजेत.सामायिकरण मुलांना तडजोड आणि निष्पक्षता शिकवते. यामुळे मुलांना हे शिकण्यास मदत मिळते की इतरांना थोडेसे दिले तर त्या बदल्यात त्यांना काहीतरी मिळू शकते. सात ते आठ वर्षाच्या वयापर्यंत, मुले निष्पक्षते बद्दल अधिक चिंताग्रस्त होतात आणि इतरांसह सामायिक करण्यास तयार होतात.

* ऐकणे

ऐकणे हे एक महत्वाचे सामाजिक कौशल्य आहे. परंतु अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. ज्यामध्ये प्रौढांचा समावेश अधिक असतो. ऐकणे म्हणजेच समोरचे बोलत असतांना गप्प बसणे असा नाही तर काय बोलत आहेत हे समजून घेणे. संभाषणात जस बोलणं आणि तुमचा दुष्टिकोण मांडण महत्वाच आहे, तसंच ते एकणही महत्वाच आहे. हे मुलांना शैक्षणिक क्षेत्रात देखील मदत करते.

लहान मुलांना ही 5 सोशल स्किल शिकवली पाहिजेत
Beach Lovers गोव्यातील नारळाच्या झाडात वेढलेले हे सुंदर ठिकाण तुम्हाला माहिती आहे का?

* सहकार्य करणे

सहकार्य करणे म्हणजे सामान्य ध्येय साध्य करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीबरोबर चांगले काम करणे एकमेकांना मदत केल्याने मुलांनाही इतरांकडून आदर मिळतो. कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी इतर लोकाना मदत केल्याने भावना आणि विचार स्वकरण्यास शिवण्यास मदत करते.

* शिष्टाचार

चांगले शिष्टाचार शिकवणे हा देखील सामाजिक कौशल्याचा एक भाग आहे. धन्यवाद, क्षमस्व यासारख्या शब्दांचा योग्य वापर केल्याने आपल्याला खूप मदत मिळते. ही सर्व कौशल्य शाळेत शिकवली जातात, पण तुम्ही तुमच्या मुलांना या सवयी लावल्या पाहिजेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com