चॉकलेट डे 2021: डार्क चॉकलेटचे जाणून घ्या असेही फायदे

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

हेल्थलाइनच्या वृत्तानुसार डार्क चॉकलेट आपल्या आरोग्यासाठी अनेक दृष्टीकोनातून सकारात्मक फायदे देणारे आहे. आपल्याला या डार्क चॉकलेट ची एकच बाजू माहित आहे.

चॉकलेट डे 2021: कुठल्याही गोष्टीची एक चांगली सुरुवात करण्यासाठी काहीतरी गोड असणे आवश्यक आहे. तेव्हा आज चॉकलेट डेच्या दिवशी आपण आपल्या जोडीदारास चॉकलेट गिफ्ट करू शकता. या दिवसासाठी चॉकलेटचे भन्नाट आणि अतिशय सुंदर पॅकिंग आपल्याला करून मिळते. आपल्या जोडीदारास चॉकलेट देऊन, आपल्यासाठी तो किंवा ती किती खास आहे हे सांगू शकता. आपले प्रेम त्यांच्यासाठी किती खास आहे हे दर्शवू शकता. तूम्हाला जर का आवडत असेल तर तूम्ही आपल्या जोडीदारास भेट म्हणून डार्क चॉकलेट देऊ शकता.

हेल्थलाइनच्या वृत्तानुसार डार्क चॉकलेट आपल्या आरोग्यासाठी अनेक दृष्टीकोनातून सकारात्मक फायदे देणारे आहे. आपल्याला या डार्क चॉकलेट ची एकच बाजू माहित आहे. पण डार्क चॉकलेट आरोग्यासाठीही खूप गुणकारी आहे. डार्क चॉकलेट रक्तातील शुगर आणि हृदय रोगांसारखे गंभीर रोग शरीरापासून दूर ठेवण्यास मदत करते. एवढेच नाही तर गे चॉकलेट खाल्ल्याने तणावही कमी होतो. आजच्या धावपळीच्या काळात वर्क करून आपम थकून जातो. तेव्हा हे चॉकलेट खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगलेच फायदेशीर ठरू शकते. डार्क चॉकलेट खाल्ल्याने आपण कोणते आजार टाळू शकतो हे आता जाणून घेऊया.

शुगर नियंत्रित ठेवते

ब्लड शुगर वाढल्याने शरीरात अनेक गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. डार्क चॉकलेटमध्ये असे काही गुणधर्म असतात ब्लड शुगर लेवल मेंटेन ठेवते. ज्यामुळे  डायबिटीज सारख्या आजारापासून आपम आपला बचाव करू शकतो.

हृदयविकारापासून दूर ठेवते

डार्क चॉकलेटमध्ये कार्डियोप्रोटेक्टिव गुणधर्म आहेत. हे हृदयाला अनेक प्रकारच्या गंभीर आजारांपासून वाचवते. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग टाळण्यासाठी तूम्ही डार्क चॉकलेट नेहमीच खावू शकता.

वृद्धत्व कमी करते

वृद्धत्वाचा प्रभाव कमी करण्याचा विशेष गुणधर्म डार्क चॉकलेटमध्ये आहे. म्हणूनच, ज्यांना वाढत्या वयाचा प्रभाव कमी करायचा आहे, त्यांनी डार्क चॉकलेट खाणे आवश्यक आहे. हे एक एंटी एंजिग घटक म्हणून कार्य करते.

ताणतणाव कमी करते

तणाव अशी एक गोष्ट आहे जी एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात कधीतरी नक्कीच त्रासदायक ठरू शकते. अनेक गंभीर आजाराचे कारण तणाव असू शकते असे मानल जाते. ताणतणाव टाळण्यासाठी डार्क चॉकलेट खूप उपयुक्त ठरू शकते. वास्तविक डार्क चॉकलेटमध्ये तणाव कमी करण्याचा विशेष गुणधर्म असतो.

रक्तदाब कमी करते

ब्लड प्रेशरच्या वाढत्या प्रभावाला हाइपरटेंशन  पण म्हणतात. ज्या लोकांना हाई ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांनी डार्क चॉकलेट नक्कीच खावे. डार्क चॉकलेटमध्ये मॅग्नेशियम आहे, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

गोव्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संबंधित बातम्या